जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 07:33 PM2020-10-19T19:33:26+5:302020-10-19T19:37:50+5:30

bribe,crimenews, kolhapurnews, पाझर तलावात मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी सुमारे १८ हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ताराबाई पार्क येथील सिचन भवनध्ये मृद व जलसंधारण विभागात सोमवारी सायंकाळी पथकाने  ही कारवाई केली.

Two water conservation officials caught in bribery trap | जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देमत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी लाच स्विकारली सिंचन भवनमध्ये मृद व जलसंधारण विभागात कारवाई

कोल्हापूर : पाझर तलावात मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी सुमारे १८ हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील जलसंधारण विभागाचे दोघे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ताराबाई पार्क येथील सिचन भवनध्ये मृद व जलसंधारण विभागात सोमवारी सायंकाळी पथकाने  ही कारवाई केली.

जलसंधारण अधिकारी शिवाजी हणमंत नेरकर (वय ५२, रा. प्लॉट नं. १५, निवारा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) व कार्यकारी अभियंता यशवंत लक्ष्मण थोरात (वय ५५, रा. वारणा बंगला, सिंचन भवन जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. मुळ रा. डी. २, गणेश गार्डन, बिबवेवाडी, पुणे) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदाराला पाझर तलावामध्ये मत्स्यव्यवसाय करण्यासाठी परवाना हवा होता. त्यासाठी तो गेले अनेक दिवस ताराबाई पार्कमधील वारणा भवनमधील जलसंधारण विभागातील मृद व जलसंधारण विभागात फेऱ्या मारत होता.
जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर व कार्यकारी अभियंता यशवंत थोरात या दोघांशी त्याची चर्चा सुरु होती. त्यावेळी हा परवाना देण्यासाठी संशयीत नेसरकर याने २० हजाराची मागणी केली. कार्यकारी अभियंता थोरात यांना ही रक्कम द्यावी लागते असे सांगून लाच मागितली. तडजोडअंती सुमारे १८ हजार देण्याचे निश्चीत झाले.

दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताराबाई पार्कमधील सिंचन भवनच्या मृद व जलसंधारण विभागात सापळा रचला.

त्यावेळी तक्रारदाराकडून नेजकर याने लाच स्विकारली, त्याने पैसे घेतल्याचे कार्यकारी अभियंता थोरात यांना कल्पना दिल्यानंतर त्यानीही मागणीस संमती दर्शवली. सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दोघांनाही पकडून त्याच्या ताब्यातील लाचेची १८ हजाराची रक्कम ताब्यात घेतली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. जितेंद्र पाटील, सहा. फौ. संजीव बंबर्गकर, हे. कॉ. शरद पोरे, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने यांनी केली.
 

Web Title: Two water conservation officials caught in bribery trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.