गळती काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:42+5:302021-08-14T04:30:42+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे फुलेवाडी रिंग रोडवर गजानन कॉलनी चौकात खोदलेला खड्डा गेला दीड महिना उघडाच ...

The two-wheeler fell into a pit dug to remove the leak | गळती काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर

गळती काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर

Next

कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे फुलेवाडी रिंग रोडवर गजानन कॉलनी चौकात खोदलेला खड्डा गेला दीड महिना उघडाच राहिला. त्यामध्ये पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सौरभ गोमसे (वय १९, रा. १९४७, सी वॉर्ड, उत्तरेश्वर पेठ) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी (दि. १२) रात्री ही दुर्घटना घडली. अपघातानंतर टीकेला सामोरे जाऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने शुक्रवारी तातडीने जेसीबी मशीनद्वारे धोकादायक खड्डा बुजविला गेला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, फुलेवाडी रिंग रोडवर अवजड वाहनांसह इतर वाहने भरधाव वेगाने धावतात. या मार्गावरील मुख्य पाईपलाईनमध्ये कचरा अडकल्याने महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गजानन कॉलनी चौकात दीड महिन्यापूर्वी मोठा खड्डा खणला. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत झाला तरीही हा खड्डा बुजवण्याचा कर्मचाऱ्यांना जणू विसरच पडला. गुरुवारी रात्री सौरभ गोमसे हा मोपेडवरून बोंद्रेनगरातील नातेवाइकाकडे जात होता, त्याला हा खड्डा न दिसल्याने तो मोपेडसह त्यात पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तातडीने सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

महापालिकेस सुचले शहाणपण...

दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तातडीने हा दुर्घटनाग्रस्त खड्डा जेसीबीने बुजविला. खड्डा बुजविण्याबाबत यापूर्वी अनेक वेळा पाणीपुरवठा विभागाला फोन करून कल्पना दिली; पण अधिकाऱ्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

रिंग रोडवरील उकरलेले खड्डे बनले मृत्यूचे सापळे

पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रिंग रोडवर शाहू चौक, बोंद्रेनगर चौक, शिवशक्तीनगर, बाळासाहेब इंगवलेनगर, आदी ठिकाणी गळती काढण्यासाठी खोदलेले मोठमोठे खड्डे हे धोकादायक स्थितीत दोन महिन्यांपासून उघडेच आहेत. ते बुजवले नसल्याने मृत्यूचे सापळे बनले आहेत.

फोटो नं. १३०८२०२१-कोल-फुलेवाडी रिंग रोड (फोटो बातमीला ॲटॅच अगर कोलडेस्कवर)

ओळ : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवर पाणीपुरवठा विभागाने खोदलेल्या खड्ड्यात पडून मोपेडस्वार गंभीर जखमी झाला. दीड महिन्यापासून उघडा असलेला खड्डा दुर्घटनेनंतर तातडीने जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी बुजविला.

130821\13kol_7_13082021_5.jpg

ओळ : फुलेवाडी रिंगरोडवर पाणीपुरवठा विभागाने खोदलेल्या खड्ड्यात पडून मोपेडस्वार गंभीर जखमी झाला, दिड महिन्यापासून उघडा असलेला खड्डा दुर्घटनेंनंतर तातडीने जेसीबीच्या सहाय्याने शुक्रवारी मुजवला.

Web Title: The two-wheeler fell into a pit dug to remove the leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.