Kolhapur: भरधाव ट्रकरची दुचाकीस धडक, एकजण जागीच ठार; ट्रकचालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 04:07 PM2024-06-28T16:07:54+5:302024-06-28T16:09:24+5:30

ट्रकने दुचाकीस जोरदार धडक देऊन तब्बल ७० फुट फरपटत नेले

Two-wheeler hit by speeding trucker in parite Kolhapur, one killed on the spot | Kolhapur: भरधाव ट्रकरची दुचाकीस धडक, एकजण जागीच ठार; ट्रकचालक पसार

Kolhapur: भरधाव ट्रकरची दुचाकीस धडक, एकजण जागीच ठार; ट्रकचालक पसार

राजेंद्र पाटील

भोगावती : परिते-म्हाळुंगे (ता.करवीर) दरम्यान असणाऱ्या खडी या ठिकाणी भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास धडक देऊन एकाला जाग्यावरच चिरडले. विजय शंकर कांजर (वय ४६, रा.निगवे खालसा. ता करवीर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ट्रकचा चालक आणि क्लीनर दोघेही अपघातानंतर पळून गेले. अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा महालक्ष्मी पशुखाद्य पुरवठा करणारा ट्रक (एमएच-११-एम-५७६१) परितेकडून म्हाळुंगे मार्गे भरधाव वेगाने जात होता. तर म्हाळुंगेकडून परितेकडे दुचाकी क्रमांक (एम एच०९ डिव्ही २४८३) वरून विजय कांजर हे परितेच्या हद्दीत असणाऱ्या खडी या ठिकाणी निघाले होते. दरम्यान ट्रकने त्याच्या दुचाकीस जोरदार धडक देऊन तब्बल ७० फुटावर फरपटत नेले. यात विजय कांजर यांचा जागीच मृत्यू झाला. कांजर यांना फरपटत नेल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची भीषणता पाहून ट्रक चालक आणि क्लीनर दोघे पळून गेले. 

परिते आणि म्हाळुंगे गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावातील तरुणांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. मृत विजय कांजर प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Two-wheeler hit by speeding trucker in parite Kolhapur, one killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.