टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:04+5:302021-04-02T04:25:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील रंकाळा रोडवर भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्‍वार जखमी झाला. कृष्‍णा आनंदा पाटील (वय ४०, ...

Two-wheeler injured in tanker collision | टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील रंकाळा रोडवर भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्‍वार जखमी झाला. कृष्‍णा आनंदा पाटील (वय ४०, रा. वाकरे, करवीर) असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी दुचाकीस्वार पाटील हे शहरात येताना नागोजीराव पाटणकर शाळेसमोर हा अपघात झाला. त्‍यांना उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

नवले येथे छपरावरून पडून वृद्ध जखमी

कोल्‍हापूर : नवले (ता. भूदरगड) येथे जुन्‍या घराची दुरुस्‍ती करताना छपरावरून खाली पडल्‍याने वृद्ध जखमी झाले. मनोहर सखाराम पाटील (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. त्‍यांच्यावर सीपीआरमध्‍ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

लक्ष्मीपुरीत अपघातात एक जखमी

कोल्‍हापूर : लक्ष्‍मीपुरीतील फोर्ड कॉर्नरनजीक अपघातात संजय तुकाराम शिंगे (वय ५०, रा. लक्ष्‍मीपुरी) हे जखमी झाले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता हा अपघात घडला. त्‍यांना उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले. याची नोंद लक्ष्‍मीपुरी पोलीस ठाण्‍यात झाली आहे.

Web Title: Two-wheeler injured in tanker collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.