इचलकरंजीत चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:38+5:302021-08-17T04:30:38+5:30

इचलकरंजी : जवाहर नगर भागातील तेजराज ड्रेसेसमध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना शिवाजी नगर पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले. सुमित्रा ...

Two women arrested in Ichalkaranji theft case | इचलकरंजीत चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक

इचलकरंजीत चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक

googlenewsNext

इचलकरंजी : जवाहर नगर भागातील तेजराज ड्रेसेसमध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना शिवाजी नगर पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले. सुमित्रा कल्लाप्पा चौगले व विमल तानाजी चौगले (दोघी रा. हातकणंगले) अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून सोन्याचे गंठण व कानातील बाली असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत माहिती अशी, शहरातील तेजराज ड्रेसेस या दुकानात ग्राहक खरेदीसाठी गेले असता, त्यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्या महिलांनी लंपास केली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलीस तपास करत असताना सीसी टीव्ही फुटेज व गोपनीय बातमीच्या आधारे चोरी करणाऱ्या महिला सुमित्रा चौगले व विमल चौगले यांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Two women arrested in Ichalkaranji theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.