Kolhapur: आईचा हात सोडून चिमुकला आजोबांकडे जायला धावला, अन् भरधाव कारच्या चाकाखाली सापडला; पन्हाळ्यावर झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 06:41 PM2023-04-19T18:41:58+5:302023-04-19T18:47:31+5:30

चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा

two year old child died in an accident Panhal fort | Kolhapur: आईचा हात सोडून चिमुकला आजोबांकडे जायला धावला, अन् भरधाव कारच्या चाकाखाली सापडला; पन्हाळ्यावर झाला अपघात

Kolhapur: आईचा हात सोडून चिमुकला आजोबांकडे जायला धावला, अन् भरधाव कारच्या चाकाखाली सापडला; पन्हाळ्यावर झाला अपघात

googlenewsNext

नितीन भगवान

पन्हाळा: आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेल्या आजोबांकडे धाव घेत असताना भरधाव कारच्या चाकाखाली दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. इंद्रनील अरुण दबडे (रा. खानापूर, तालुका. भुदरगड, जिल्हा, कोल्हापूर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. पन्हाळगडावर पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबांबर काळाने घाला घातल्याची ही घटना आज, बुधवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास घडली. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, खानापूर येथील अरुण दबडे आणि त्यांचे कुटुंबीय पर्यटनासाठी आले होते. देव दर्शन घेवून जोतिबावरून ते पन्हाळा पाहण्यासाठी आले. त्यांच्यासोबत आई-वडील मित्रपरिवार आले होते. सज्जाकोटी पाहण्यासाठी निघाले असता तबक उद्यान समोरील चहाच्या टपरीवर ते सर्व जण थांबले होते. 

यादरम्यान, चिमुकल्या इंद्रनीलने आपल्या आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेल्या आजोबांकडे धाव घेतली. याचवेळी सज्जाकोटी कडून येणारी (एम एच ४५ ए एल ६२०३) ही सुधीर कुमार हांडे (रा. करमाळा) यांच्या भरधाव कारच्या चाकाखाली इंद्रनील सापडला.

इंद्रनीलच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने तत्काळ पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालय हलवण्यात आले. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. यावेळी दबडे कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Web Title: two year old child died in an accident Panhal fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.