कोहळा मिळवण्यासाठीेच्या हुल्लडबाजीत दोन तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 02:19 PM2019-10-03T14:19:29+5:302019-10-03T14:48:50+5:30
करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ््यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या हुल्लजबाजीत दोन तरुण जखमी झाले.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ््यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या हुल्लजबाजीत दोन तरुण जखमी झाले.
हुल्लडबाजीला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळ्याचे तुकडे घरी नेल्याने संपत्ती वाढते असा समज असल्याने तो मिळवण्यासाठी ही धडपड असते मात्र ही समजून अत्यंत चुकीची असून तिला धार्मिक आधार नसल्याचे तज्ञांनी सांगितले.
गुरूवारी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी व गुरूमहाराजांची अशा तीन पालख्या भाविकांना भेटी देत त्र्यंबोलीवर पोहोचल्या. खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते गुरव कुटूंबातील सलोनी विनायक गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. तिच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा फोडण्याचा विधी झाल्यानंतर लगेचच कोहळा मिळवण्यासाठी हुल्लजबाजीला सुरूवात झाली.
मंदिराभोवतीने सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळा मिळालेल्या तरुणामागे सगळे धावत सुटल्याने सोहळा पाहण्यासाठी आलेल्या महिला, बालके यांच्यासह भाविकांचीही पळापळ होत होती, भीतीदायक वातावरण होते. पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही हे शक्य झाले नाही.