किरकोळ वादावादीचे प्रकार; सकाळीच बहुतांश मतदान

By admin | Published: November 2, 2015 12:44 AM2015-11-02T00:44:59+5:302015-11-02T00:44:59+5:30

बारा प्रभागांत सकाळी ११ पर्यंत सरासरी २२ टक्के मतदान

Types of retail debates; Most votes in the morning | किरकोळ वादावादीचे प्रकार; सकाळीच बहुतांश मतदान

किरकोळ वादावादीचे प्रकार; सकाळीच बहुतांश मतदान

Next

कोल्हापूर : ध्यानचंद हॉकी स्टेडियम विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या बारा प्रभागांत सकाळी ११ पर्यंत सरासरी २२ टक्के मतदान झाले. केंद्राजवळ थांबण्यावरून कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू राहिल्याने केंद्राबाहेर लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, तपोवन प्रभागातील शीलादेवी शिंदे हायस्कूलमधील शाहू मराठी शाळा केंद्रावर सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आईसह येऊन मतदानाचा हक्क बजावला. आमदार अमल महाडिक यांनी सर्वच प्रभागांतील केंद्रांवर भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत गर्दीने उच्चांक गाठला. काही मतदारांनी केंद्राबाहेर लागलेली रांग पाहून ‘नंतर येऊ’ असे म्हणत परत जाणे पसंत केले. मतदार यादीतील घोळाचा फटका अनेक मतदारांना बसला. यादीत नाव नसल्यामुळेही काही मतदारांची तारांबळ उडाली.
४० हजार ६३२ मतदान...
ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बारा प्रभागांत २९ हजार ६६५ स्त्रियांचे, तर ३० हजार ५५८ पुरुषांचे असे एकूण ६० हजार २२३ मतदार आहेत. त्यापैकी १९ हजार ७३६ स्त्रियांनी आणि २० हजार ८९६ पुरुष असे एकूण ४० हजार ६३२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बारा प्रभागांत सर्वाधिक रामानंदनगर-जरगनगर प्रभागात ७२ टक्के मतदान झाले.
काही काळ गोंधळ
साळोखेनगर प्रभागात शिवशक्ती विद्यालयातील केंद्रात मोठी गर्दी होती. सुरुवातीला पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे उमेदवार व समर्थक केंद्राजवळ जाऊन आवाहन करीत होते. येथे मतदान अधिकाऱ्याने मतदार यादीत दुबार नाव असलेल्या मतदारांना रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत दुबार नाव असलेल्यांनाही मतदान करू दिले.

Web Title: Types of retail debates; Most votes in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.