कर्नाटकी पोलिसांची दंडुकेशाही; मराठी तरुणांना अमानुष मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:56+5:302021-03-16T04:25:56+5:30
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करून कार वर लावलेल्या शिवसेना फलकाला काळे फासून ...
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करून कार वर लावलेल्या शिवसेना फलकाला काळे फासून मोडतोड केली होती. त्यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख आणि प्रवीण तेजम यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रसंगाचा व्हिडिओ आणि फोटो काहीजणांनी फेसबुकवर पोस्ट करून स्टेट्स ठेवून ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असे लिहिले होते. हे पाहून पोलिसांनी चार तरुणांवर केस दाखल केल्या आहेत. या चार तरुणांना पोलिसांनी अमानुष मारहाणदेखील केली. पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने त्या तरुणांच्या पाठीवर वळदेखील उठले आहेत.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर नेहमीच कर्नाटक सरकार आणि पोलीस अन्याय करते. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर गुलामगिरीची सत्ता लादत आहे. मराठी तरुणांवर अशाप्रकार अमानुष मारहाण झाल्याने सीमाभागातील मराठी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
१५ बेळगाव मारहाण