उचगावच्या जवानाचा झारखंडमध्ये विषबाधेने मृत्यू

By admin | Published: September 25, 2015 12:12 AM2015-09-25T00:12:43+5:302015-09-25T00:26:26+5:30

ते १९९७ पासून बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत होते. गेली १७ वर्षे ते सेवा बजावत होते.

Uchgaon jawans die from poison in Jharkhand | उचगावच्या जवानाचा झारखंडमध्ये विषबाधेने मृत्यू

उचगावच्या जवानाचा झारखंडमध्ये विषबाधेने मृत्यू

Next

उचगाव : येथील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील मोठे कॉलनी येथील भरत अनंत कित्तूर (वय ३४) या जवानाचे झारखंडमधील रांची येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना विषबाधेमुळे निधन झाले. ते १९९७ पासून बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत होते. गेली १७ वर्षे ते सेवा बजावत होते. ते भाऊबिजेच्या निमित्ताने नुकतेच गावी आले होते. उचगाव ग्रामपंचायतीमध्ये गांंधीनगर पोलीस ठाण्यामार्फत सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी कित्तूर यांना मानवंदना देऊन पुष्पचक्र वाहण्यात आले. रांचीत मित्रांसमवेत प्रवास करताना अन्नातून त्यांना विषबाधा झाली होती. मणेर मळ्यात ते वल्लू नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली. गावातून ट्रॅक्टरने सजविलेल्या ट्रॉलीतून त्यांची अंत्ययात्रा काढली. यावेळी मणेर मळ्यातील सर्व दुकाने बंद होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, तीन भाऊ, आई असा परिवार आहे. हिंदवी बॉईज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेची तयारी केली. उचगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी दत्तात्रय तोरस्कर, अ‍ॅड. सचिन देशमुख, सचिन गाताडे, इरफान मणेर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Uchgaon jawans die from poison in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.