विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ

By समीर देशपांडे | Published: July 6, 2024 12:17 PM2024-07-06T12:17:00+5:302024-07-06T12:18:03+5:30

विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद

Uddhav Thackeray does not seem to have listened to Sharad Pawar in Legislative Council elections says Minister Hasan Mushrif | विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ

विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये हे शरद पवारांचे म्हणणे उद्धव ठाकरे यांनी ऐकलेले दिसत नाही अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर येथे नियोजन समितीच्या बैठकीला आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, महायुतीचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार विजयी होणार असून पवार किंवा ठाकरे गटाचा एक उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात. विनय कोरे यांना किती जागा सोडायच्या याचा निर्णय वरिष्ठ घेतील.

विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद

विशाळगड येथील अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही मर्यादा आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्याला भेटल्यास त्यांची समजूत काढू. 

वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद झाला पाहिजे

विजयी क्रिकेटरना शासनाकडून बक्षीस दिल्याबद्दल दोन्हीकडून चर्चा आहे. सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला याचा आनंद झाला पाहिजे असे ते म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray does not seem to have listened to Sharad Pawar in Legislative Council elections says Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.