विधानसभेच्या तयारीला लागा : ठाकरे : ‘मातोश्री’वर मंडलिक, धैर्यशील माने यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:20 AM2019-05-28T11:20:38+5:302019-05-28T11:25:33+5:30
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी सहकुटुंब ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही खासदारांचे स्वागत केले, तर त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही खासदारांचे औक्षण केले.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी सहकुटुंब ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही खासदारांचे स्वागत केले, तर त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही खासदारांचे औक्षण केले.
यावेळी आता लोकसभेप्रमाणे विधानसभेच्याही तयारीला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांना येथे केले. पक्षाच्या सर्वच खासदारांना घेऊन लवकरच करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनाला येऊ, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या कोल्हापूरसह हातकणंगले, मावळ, सिंधुदुर्ग, हिंगोली येथील खासदारांनी ‘मातोश्री’वर ठाकरे यांंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार स्वागत केले. रश्मी ठाकरे यांनी दोघांचेही औक्षण केले.
मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी समर जाधव, निवेदिता माने, रश्मी ठाकरे, वेदांतिका माने उपस्थित होत्या.
मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे औक्षण केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आदी उपस्थित होते.
यावेळी वैशाली संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका धैर्यशील माने, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख शिवाजी जाधव, आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, कोल्हापूरवर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून देऊन येथील जनतेने पूर्ण करून विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे ऋण विसरू शकत नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईने ताकद दिली; त्यासाठी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व खासदारांना घेऊन लवकरच अंबाबाईच्या दर्शनाला येऊ.
संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल. त्यांच्यासह सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांनी लोकसभेपाठोपाठ शिवसेनेला घवघवीत यश मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे.
यावेळी समर जाधव, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, नामदेव गिरी, सयाजी चव्हाण, सतीश मलमे, बाजीराव चव्हाण, मंगल चव्हाण, शुभांगी पोवार, हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते. मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रश्मी ठाकरे, वैशाली मंडलिक उपस्थित होत्या.