उद्धव ठाकरेंनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा निर्णय घेतला, माजी मंत्री विजय शिवतारेंचा हल्लाबोल
By समीर देशपांडे | Published: February 16, 2024 03:37 PM2024-02-16T15:37:36+5:302024-02-16T15:43:37+5:30
कोल्हापूर : विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर जर आम्हा सर्वांना बोलावून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे का असे विचारले असते तर आम्ही ...
कोल्हापूर: विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर जर आम्हा सर्वांना बोलावून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे का असे विचारले असते तर आम्ही सर्वांनी विरोधच केला असता. परंतू उद्धव ठाकरे यांनी आम्हांला कोणालाही विश्वासात न घेता शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा निर्णय घेतला. अन्यथा महाविकास आघाडी सत्तेतच आली नसती असा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला.
शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेन पण काँग्रेस सोबत जाणार नाही. काँग्रेसची पंचसूत्री गाडा असे म्हणणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांची पायमल्ली उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी काँगेसशी जुळवून घेतले त्याचवेळी हिंदूत्ववादी पक्षांचे दरवाजे त्यांनी बंद करून घेतले.
माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी आम्हा तमाम सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. सामान्य जनतेला, कष्टकरी, शेतकऱ्यांना विविध निर्णयांच्या माध्यमातून दिलासा देणारे शिंदे यांचे नेतृत्व आहे. यावेळी शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.