लॉरी ऑपरेटर्सचा देशव्यापी चक्काजामचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 06:16 PM2021-03-06T18:16:24+5:302021-03-06T18:18:58+5:30

Rto Kolhapur- डिझेल दरवाढ, स्क्रॅप पॉलिसी, ई-वे बील, जीएसटी, थर्ड पार्टी विमा याबाबतची केंद्र सरकारची सध्याची धोरणे मालवाहतूकदारांना मारक असून त्यातून हा व्यवसायच धोक्यात आल्यामुळे देशव्यापी चक्काजामचा सरकारला १४ दिवसांचा अल्टिमेटम दिला असल्याची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रॅन्स्पोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरंगसिंग अटवाळ यांनी शनिवारी येथे दिली.

Ultimatum of lorry operators nationwide chakkajam | लॉरी ऑपरेटर्सचा देशव्यापी चक्काजामचा अल्टिमेटम

कोल्हापूरातील जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनला ऑल इंडिया मोटार ट्रॅन्स्पोर्ट काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भेट दिली. यानिमित्त एआयएटीसीचे अध्यक्ष कुलतरंगसिंग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा, राज्य व देश पातळीवर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. (छाया राज मकानदार)

Next
ठळक मुद्देलॉरी ऑपरेटर्सचा देशव्यापी चक्काजामचा अल्टिमेटमजिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनला कुलतरंगसिंग अटवळ यांची भेट

कोल्हापूर : डिझेल दरवाढ, स्क्रॅप पॉलिसी, ई-वे बील, जीएसटी, थर्ड पार्टी विमा याबाबतची केंद्र सरकारची सध्याची धोरणे मालवाहतूकदारांना मारक असून त्यातून हा व्यवसायच धोक्यात आल्यामुळे देशव्यापी चक्काजामचा सरकारला १४ दिवसांचा अल्टिमेटम दिला असल्याची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रॅन्स्पोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरंगसिंग अटवाळ यांनी शनिवारी येथे दिली. कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

सरकार आम्हाला संप करण्यास भाग पाडत आहे. सरकारशी चर्चा केली जाणार नाही. आता सरकारने थेट मागण्या मान्य कराव्यात. सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुलतरंगसिंग म्हणाले, सरकारला मालवाहतुकदार डिझेल आणि करापोटी दिवसाकाठी ८ ते १० हजार कोटी रुपये देतात. आम्हीच जर १० ते १५ दिवस चक्काजाम केला तर कोट्यावधीचे सरकारचे नुकसान होईल. सरकार आमच्या जीवावर चालते. डिझेलचे भाव त्वरीत कमी करून देशभरात एकच भाव करावेत. डिझेल जीएसटीमध्ये आणल्यास १५ ते २० रूपयांनी दर कमी होईल. कोरोनामुळे सरकार आम्हांला मदत करेल असे वाटत होते. मात्र नेमके उलटे झाले आहे.

जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर,विजय भोसले, विजय पाटील, बाबा चौगले, सतीश घाटगे, जयंत पाटील विजय पोवार आदी उपस्थित होते.

 

Web Title: Ultimatum of lorry operators nationwide chakkajam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.