Kolhapur: मनासारखी नोकरी मिळत नाही, नैराश्यातून खणीत उडी घेऊन अभियंत्याने संपवले जीवन

By उद्धव गोडसे | Published: October 31, 2023 03:25 PM2023-10-31T15:25:00+5:302023-10-31T15:25:15+5:30

कष्टातून इंजिनिअर बनवलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या आईला मानसिक धक्का बसला.

Unable to get a job, an engineer ends his life by jumping into a mine due to depression in Kolhapur | Kolhapur: मनासारखी नोकरी मिळत नाही, नैराश्यातून खणीत उडी घेऊन अभियंत्याने संपवले जीवन

Kolhapur: मनासारखी नोकरी मिळत नाही, नैराश्यातून खणीत उडी घेऊन अभियंत्याने संपवले जीवन

कोल्हापूर : मनासारखी नोकरी मिळत नसल्याने मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाने रंकाळा परिसरातील खणीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ३१) सकाळी उघडकीस आला. शिवम अनिल सावंत (वय २६, रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. कष्टातून इंजिनिअर बनवलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या आईला मानसिक धक्का बसला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवम सावंत हा संभाजीनगर येथे आई, भाऊ, बहीण आणि आजीसोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, आईने मोठ्या कष्टातून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला शिवम एका खासगी कंपनीत काम करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो नवीन नोकरीच्या शोधात होता. मात्र, मनासारखी नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता. 

सोमवारी (दि. ३०) सायंकाळी तो घरातून बेपत्ता झाला. मंगळवारी सकाळी रंकाळा परिसरातील खणीत त्याचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

Web Title: Unable to get a job, an engineer ends his life by jumping into a mine due to depression in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.