अनाधिकृत फलक हटविण्याची मोहीम सुरू, २९३ फलक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:19+5:302021-01-08T05:13:19+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी शहरातील विविध ठिकाणचे अवैध व अनधिकृत २९३ जाहिरात फलक, होर्डिंग्ज काढून ...
कोल्हापूर : महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी शहरातील विविध ठिकाणचे अवैध व अनधिकृत २९३ जाहिरात फलक, होर्डिंग्ज काढून ती जप्त केली.
ही मोहीम विभागीय कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने शुक्रवारपासून राबविण्यात येत आहे. यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत ६२ डिजिटल फलक, विभागीय कार्यालय क्रमांक २ अंतर्गत १६, विभागीय कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत पाच, विभागीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत ३४ फलक जप्त करण्यात आले. याशिवाय अतिक्रमण विभागाच्यावतीने ३४ डिजिटल फलक तसेच खांबांवर, इतर ठिकाणी अडकविलेले १४२ बॅनर्स काढून जप्त करण्यात आले.
नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपातील जाहिरात फलक, शुभेच्छा फलक तसेच श्रध्दांजली फलक ज्या क्षेत्रामध्ये लावणेचा आहे, त्या क्षेत्रातील विभागीय कार्यालय यांच्याकडून रितसर परवानगी घेऊन जाहिरात फलक लावावेत, अन्यथा महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमातील कलम ३ व ४ च्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. तसेच संबंधितांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.