महापालिकेच्या मुकादमास अटक बेकायदा बांधकाम : कारवाई रोखण्यासाठी सहा हजारांची घेत होता लाच

By admin | Published: May 14, 2014 12:35 AM2014-05-14T00:35:49+5:302014-05-14T00:36:18+5:30

कोल्हापूर : घराच्या वर नियमबाह्य बांधकामावर केलेली कारवाई रोखण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिका बांधकाम

Unauthorized construction of municipal corporation: 6 thousand taking bribe | महापालिकेच्या मुकादमास अटक बेकायदा बांधकाम : कारवाई रोखण्यासाठी सहा हजारांची घेत होता लाच

महापालिकेच्या मुकादमास अटक बेकायदा बांधकाम : कारवाई रोखण्यासाठी सहा हजारांची घेत होता लाच

Next

कोल्हापूर : घराच्या वर नियमबाह्य बांधकामावर केलेली कारवाई रोखण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिका बांधकाम विभागाकडील मुकादमास आज (मंगळवार) सकाळी साडेआठच्या सुमारास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. संशयित आरोपी सुनील पुंडलिक पाटोळे (वय ४०, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर) असे त्याचे नाव आहे. या कारवाईने महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली असून, बांधकाम विभागातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, म्हाडा कॉलनी येथील तक्रारदाराने महापालिका बांधकाम विभागाची परवानगी न घेता राहत्या घराच्या पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर खोल्या बांधल्या आहेत. मुकादम सुनील पाटोळे हा याच कॉलनीमध्ये राहण्यास आहे. त्याच्या निदर्शनास हे बांधकाम आले. त्याने उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्या सहीच्या आदेशाने तक्रारदारांना ३ फेब्रुवारी २०१४ रोजी नोटीस पाठविली. त्यामध्ये आपण केलेले बांधकाम हे नियमबाह्य असलेने ते का पाडू नये, त्याचे पंधरा दिवसांत लेखी कारण सादर करावे, अन्यथा बांधकाम पाडण्यात येईल, असे त्यामध्ये म्हटले होते. यावेळी पाटोळे याने नोटिसीवर स्वत:चे नाव व मोबाईल नंबर लिहून दिला. ही नोटीस तक्रारदारांना मिळताच त्यांनी पाटोळेची त्यांच्या घरी भेट घेऊन नोटिसीबाबत चर्चा केली. यावेळी त्याने ‘तुम्ही नियमबाह्य बांधकाम केल्याने ४० हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याऐवजी मला २० हजार रुपये द्या; नोटीस रद्द करून होणारी कारवाई थांबवतो,’ असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी थेट लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. पोलिसांच्या सांगण्यानुसार कारवाई रोखण्यासाठी माझ्याकडे वीस हजार रुपये नाहीत, थोडेफार कमी करावेत,’ असे तक्रारदार फोनवर पाटोळेला बोलला. त्यावर पाटोळे याने सहा हजार रुपये घेऊन आज सकाळी आठच्या सुमारास घरी येण्यास सांगितले. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल संभाषण रेकॉर्डिंग केले. त्यानुसार पाटोळेच्या घराभोवती सापळा लावला. तक्रारदारांकडून पैसे स्वीकारताना पोलिसांनी पाटोळे यास रंगेहात पकडले. अचानक झालेल्या या कारवाईने पाटोळे भेदारला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात आणले. या ठिकाणी भीतीने त्याला सरळ उभेही राहता येत नव्हते. या कारवाईत पोलीस हवालदार श्रीधर सावंत, पोलीस नाईक जितेंद्र शिंदे, दयानंद कडूकर, महिला पोलीस बेगमइरशद गडकरी, सर्जेराव पाटील, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized construction of municipal corporation: 6 thousand taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.