साळशीच्या जीवन विद्यामंदिरचे नाबाद शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:35 AM2019-08-05T00:35:54+5:302019-08-05T00:35:58+5:30
आर. डी. पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क बांबवडे : शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचावी, भविष्यात घडणारी पिढीही सुसंस्कृत, शिक्षित असावी या ...
आर. डी. पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
बांबवडे : शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचावी, भविष्यात घडणारी पिढीही सुसंस्कृत, शिक्षित असावी या हेतूने इंग्रज सत्तेच्या काळात काही खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत शाळा, शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत संस्कारक्षम विद्यार्थी घडवत नावारूपाला आल्या. अशा एका शाळांपैकी एक शाळा म्हणजे साळशीची जीवन शिक्षण विद्यामंदिर. दि. १ एप्रिल १९१८ रोजी शाळेची स्थापना झाली. शाहूवाडी तालुक्याची शाळा, शतकोत्तर वाटचालीनंतर शिक्षणाची जीवनज्योत म्हणून ओळखली जात आहे.
सुरुवातीला मारूती मंदिर परिसरात पहिली ते चौथीचे वर्ग भरत होते. काही वर्षांनंतर पाचवी ते सातवीचे वर्ग जोडले गेले. वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्यांच्या खोल्यात शाळेने अनेक दशके ज्ञानदानाचे काम केले.
सन १९८१ ते ८९ च्या दरम्यान तत्कालीन शिक्षण व अर्थ समितीचे सभापती महादेवराव पाटील यांनी गावाच्या दक्षिणेस बिरोबाच्या माळावर गावकऱ्यांच्या सहकार्यातून शाळेची प्रशस्त इमारत उभी केली. दरम्यानच्या काळात शाळेने अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी काहीजणांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले.
विशेष उल्लेख करायचा झाल्यास ‘शिक्षकाचे गाव’ म्हणून साळशी गावची ओळख याच काळात झाली. या काळात या शाळेने ५५ ते ६० शिक्षक घडवले. तर पुढे यात वाढ होऊन ही संख्या ८० पेक्षा जास्त झाली होती. राजकारणी, नेते घडवणारी शाळा म्हणूनही या शाळेकडे पाहिले जाते.
या शाळेचे दोन माजी विद्यार्थी जि. प. सदस्य, एक पंचायत समिती सदस्य झाले. यामध्ये महादेव ज्ञानदेव पाटील, विजय गंगाधर बोरगे, जि. प. सदस्य झाले, तर महादेव श्रीपती पाटील, पं. स. सदस्य व उपसभापती झाले. याच शाळेचे विद्यार्थी दिनकर अण्णा पाटील हे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष झाले. गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा कुठेही मागे नाही. स्कॉलरशिप परीक्षेचे केंद्र म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत ३३ हून अधिक विद्यार्थी आणण्याचा विक्रम केला आहे आणि या विक्रमाचे वाटेकरी होते, याच शाळेचे विद्यार्थी विक्रम पाटील आता ही परंपरा पुढे जपण्याचे काम संजय पाटील, सुरेश पाटील, विष्णू पाटील, जयश्री मगदूम, संजय शिंदे जोमाने पुढे चालवत आहेत.
शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात सुसज्ज करण्यासाठी जि. प. सदस्य विजय बोरगे यांनी विशेष प्रयत्न केले. मैदान सपाटीकरण, सुसज्ज स्वतंत्र खोल्यांसह अद्ययावत प्रयोगशाळा, डिजिटल लर्निंगची सोय, शालेय परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यास त्यांनी सहकार्य केले तर विद्यमान सरपंच संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुला-मुलींसाठी स्वतंत्र भोजनकक्ष, चार अँड्रॉईड टीव्ही संच शाळेसाठी उपलब्ध करून दिले. यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी अभियंता राजेंद्र पाटील यांचेही योगदान मिळाले.
1981-89
च्या दरम्यान तत्कालीन शिक्षण व अर्थ समितीचे सभापती महादेवराव पाटील यांनी गावाच्या दक्षिणेस बिरोबाच्या माळावर गावकºयांच्या सहकार्यातून प्रशस्त इमारत उभी केली, याच काळात या शाळेने अनेक दिग्गज घडविले.
गुणवत्तेचे माहेरघर
गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा कुठेही मागे नाही. स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्तेचे माहेरघर म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. या शाळेने स्कॉलरशीपमध्ये ३३ हून अधिक विद्यार्थी आणण्याचा विक्रम केला आहे.