जोतिबा डोंगरावर बेवारस मृतदेह; खून झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 23:20 IST2025-04-19T23:20:30+5:302025-04-19T23:20:30+5:30

दोन दिवसांपूर्वीच हत्या झाल्याचा संशय

Unclaimed body found on Jyotiba hill Murder suspected | जोतिबा डोंगरावर बेवारस मृतदेह; खून झाल्याचा संशय

जोतिबा डोंगरावर बेवारस मृतदेह; खून झाल्याचा संशय

कोडोली : जोतिबा डोंगरावर यमाईमंदिर ते गिरोली मार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे . ही घटना शनिवारी दुपारी येथून ये जा करणाऱ्या  एका महिलेच्या निदर्शनास आली . याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे .

याबाबत पोलिसांच्या कडून  मिळालेली माहिती अशी , यमाई मंदिर ते गिरोली  मार्गावर असलेल्या  बारा जिर्तीलीग नावाच्या  परिसरात मुख्य मार्गापासून साधारण ३० ते ४० फूट अंतरावर हा मृतदेह पडला होता. या मार्गावरून जाणाऱ्या एक महिलेला हे दिसून आले . त्यांनी याबाबतची माहिती दाणेवाडीच्या पोलिस पाटील यांना सांगितली . ही माहिती समजताच कोडोली पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या गळ्याशेजारी व्रण असून गळा दाबून खून झाला असल्याची शक्यता पोलिसांच्या कडून व्यक्त होत आहे. मृतदेहाचे  हात दोरीने  बांधलेले तर तोंडास हात रुमाल बांधून त्यावर टावेलने तोड बांधलेले होते. ही घटना साधारण एक दोन दिवसातीलच घटलेली असण्याची शक्यता व्यक्त केली जात  आहे.

अज्ञात व्यक्ती ही साधारण पाच फूट ऊंचीची असून रंगाने काळसर  गोल चेहरा व टकल असणारा आहे . अंगावर पांढरा शर्ट व काळी पॅन्ट आहे . मृतदेहाजवळ ओळख पटणे सारखे  कागद पत्रे नसल्याने याचा शोध घेणे पोलिसांच्या समोर आव्हान आहे कोडोली उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवपरीक्षण करण्यात आले .

Web Title: Unclaimed body found on Jyotiba hill Murder suspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.