खर्चीवाले यंत्रमागधारकांत अस्वस्थता

By Admin | Published: February 19, 2016 12:27 AM2016-02-19T00:27:44+5:302016-02-19T00:28:05+5:30

मजुरीवाढीचा प्रश्न : व्यापाऱ्यांकडून नकाराची भूमिका; संयुक्त बैठकही नाही

Uncomfortable among expensive machine-guns | खर्चीवाले यंत्रमागधारकांत अस्वस्थता

खर्चीवाले यंत्रमागधारकांत अस्वस्थता

googlenewsNext

इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत प्रांताधिकाऱ्यांकडून कापड उत्पादक व्यापारी व यंत्रमागधारक प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन झाले नसल्याने यंत्रमागधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. व्यापारीवर्गाची नकाराची भूमिका आणि सातत्याने होत असलेले नुकसान यामुळे यंत्रमागधारक अस्वस्थ झाला आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये यंत्रमाग कामगारांच्या व अन्य प्रकारच्या मजुरीमध्ये, तसेच महागाईमध्ये वाढ झाली असताना यंत्रमागधारकांकडून जॉबवर्क पद्धतीने कापड उत्पादन करून घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या मजुरीमध्ये वाढ केलेली नाही. याचा परिणाम म्हणून खर्चीवाले यंत्रमागधारक नुकसानीत जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विजेच्या दरामध्येसुद्धा ३0 टक्के वाढ झाली आहे. म्हणून अस्वस्थ झालेल्या यंत्रमागधारकांनी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनकडे धाव घेतली. पॉवरलूम असोसिएशननेसुद्धा गेले दीड महिने प्रयत्न करूनही व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. म्हणून याबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यात आली.
सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या कापड व्यापारी व यंत्रमागधारक संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत दोन तास चर्चा होऊनसुद्धा तोडगा निघाला नाही. म्हणून त्या प्रश्नाबाबत पुन्हा बैठक बोलविण्याचे ठरले. या बैठकीसाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी तारीख देण्याचे निश्चित केले. मात्र, याला चार दिवस उलटले तरी संयुक्त बैठकीचे आयोजन झाले नसल्याने खर्चीवाला यंत्रमागधारक अस्वस्थ बनला आहे.
दरम्यान, पॉवरलूम असोसिएशनचे एक शिष्टमंडळ पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांना भेटले. त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नाबाबत आढावा घेतला. तसेच कामगारांच्या वेतनाबाबत त्यांच्या पुढाऱ्यांकडून खोट्या तक्रारी केल्या जातात. कापड व्यापाऱ्यांच्या अनिष्ट प्रथा येथील यंत्रमाग उद्योगाला अडचणीच्या ठरत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, कामगार अधिकारी डी. डी. पवार, दत्तात्रय कनोजे, नारायण दुरुगडे, महंमदरफिक खानापुरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Uncomfortable among expensive machine-guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.