जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींत बिनविरोधचा डंका
By admin | Published: October 21, 2015 11:07 PM2015-10-21T23:07:32+5:302015-10-21T23:07:32+5:30
ग्रामपंचायती निवडणुका : ५१७ जणांची तलवार म्यान; १0४ ग्रामपंचायतींसाठी १०३६ उमेदवार निवडणूक रिंगणात
सातारा : जिल्ह्यातील १७१ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात बुधवारी ५१७ उमेदवारांनी तलवार म्यान केली असून, ६६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता १०४ ग्रामपंचायतींत जोरदार धूमशान पाहायला मिळणार आहे.
१ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्यातील आंबळे, अंगापूर तर्फ तारगाव, बनघर, जोतिबाचीवाडी, खडगाव, कोंडवे, कुस बु., मापारवाडी, पाटेघर, वासोळे, अगुंडेवाडी, चाळकेवाडी, धनगरवाडी (निगडी), धनवडेवाडी, कूस खुर्द, निगुडमाळ, पिलाणीवाडी, राकुसलेवाडी, रामकृष्णनगर, भैरवगड. वाई तालुक्यातील गोळेगाव, सुलतानपूर. पाटण तालुक्यातील गुढे, अंबेघर तर्फ मरळी, डांगिष्टेवाडी, गहनबी, कारवट, पाचपुतेवाडी. महाबळेश्वरमधील कुंभरोशी, आमशी, पाली तर्फ आटेगाव, सोनाट, वानवली तर्फ सोळशी, वारसोळीदेव, वेळापूर, भीमनगर (पुनर्वसन), दाभदाभेकर, अकल्पे, बिरमणी, चिखली, घावरी, नाकिंदा, कोरेगावातील देऊर. कऱ्हाड तालुक्यातील जखीणवाडी. जावळीतील अपटी, दापवडी, धनकवडी, धोंडेवाडी, दिवदेव, जरेवाडी, केडांबे, केसकरवाडी, मोहाट, मोरावळे, शेंबडी, बाहुले या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अतीत, किडगाव, कुमठे, भरतगाव, भाटमरळी, चिंचणेर वंदन, गोवे, निनाम, पाडळी, लावंघर, सारखळ, तासगाव, वर्णे, धनगरवाडी (कोडोली), कुमठे, शिवथर, सैदापूर, सोनवडी, वनगळ (ता. सातारा), पेठकिन्हई, वाठार किरोली,
होलेवाडी, कठापूर (ता. कोरेगाव), अखेगणी, भालेघर, दुदुस्करवाडी, काटवली, महामुलकरवाडी, शेते, पवारवाडी, काळोशी (ता. जावळी), उंब्रज, कोपर्डे हवेली, शिरगाव, तांबवे (ता. कऱ्हाड), मेंढेघर, साखरी, नेचल, आंबळे, मोरेवाडी (ता. पाटण), केंजळ, जांभ, ओझर्डे, वाघजाईवाडी (वाई), कुमठे, उंबरी, चतूरबेट, दानवली, पारपार (महाबळेश्वर), वडगाव, धनगरवाडी, मोर्वे (ता. खंडाळा), वेटणे, पुनवडी (ता. खटाव), इंजबाब, रांजणी, देवापूर, वारुगड, शिंगणापूर (ता. माण), शेरेचीवाडी, पिराचीवाडी (ता. फलटण) या ग्रामपंचायतींत धूमशान होणार असून, काही ठिकाणी दुरंगी, तर बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे. (प्रतिनिधी)
नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती
सातारा तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या मतदार यादीवर काही ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याने तालुक्यातील ९३ पैकी ९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
खासदारांचे दत्तक कोंडवेही बिनविरोध
सातारा तालुक्यातील कोंडवे हे गाव खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘सांसद ग्राम’ योजनेत दत्तक घेतले आहे. या गावची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन उदयनराजेंनी केल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन खासदारांच्या विनंतीचा मान राखला आहे.
बिनविरोध ग्रामपंचायतींची तालुकानिहाय आकडेवाडी अशी
सातारा : २९ कोरेगाव : २ जावळी : १२ कऱ्हाड : १, पाटण : ६ वाई : २ महाबळेश्वर : १४