‘लोकमत रक्ताचं नातं’ अंतर्गत आर. के. नगर येथे सोमवारी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:24+5:302021-07-07T04:29:24+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिर विविध ठिकाणी होत आहे. ...
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिर विविध ठिकाणी होत आहे. या उपक्रमात मोरेवाडी येथील भाजपचे गावप्रमुख व ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आशीष पाटील आणि माजी सदस्य हेमंत नाईक, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील सहभागी झाले आहेत. त्यांच्यावतीने सोमवारी (दि. १२) आर. के. नगर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आर. के. नगर येथील तिरूपती पार्कमधील तिरुपती कला क्रीडा सांस्कृतिक हॉल येथे सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासह रोप वाटप करण्यात येणार आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन आशीष पाटील आणि हेमंत नाईक यांनी केले आहे.
फोटो (०५०७२०२१-कोल-आर के नगर लोकमत रक्तदान) : ‘लोकमत’तर्फे आयोजित महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मोरेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आशीष पाटील आणि माजी सदस्य हेमंत नाईक यांनी केले. यावेळी डावीकडून निखिल पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज जाधव उपस्थित होते.
पॉंईंटर
आज या ठिकाणी होणार शिबीरे
आपणही ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकता. आज, मंगळवारी खालील ठिकाणी महारक्तदान शिबिर होत आहे.
१) कोल्हापूर : जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने रक्तदान शिबिर होणार आहे.
स्थळ : अलंकार हॉल, पोलीस ग्राऊंडजवळ कोल्हापूर. वेळ : सकाळी नऊ ते दुपारी दोन.
२) इचलकरंजी : आवाडे समर्थक ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर होणार आहे.
स्थळ : आयको स्पिनिंग मिल, शिवनाकवाडी, इचलकरंजी. वेळ : सकाळी दहा ते सायंकाळी पाच
३) वाठार : माजी खासदार जयवंतराव आवळे समर्थकांच्यावतीने रक्तदान शिबिर होणार आहे.
स्थळ : महात्मा फुले सूतगिरणी, वाठार-पेठवडगाव. वेळ : सकाळी दहा ते दुपारी चार.
050721\05kol_3_05072021_5.jpg
फोटो (०५०७२०२१-कोल-आर के नगर लोकमत रक्तदान) : ‘लोकमत’तर्फे आयोजित महारक्तदान शिबीरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन मोरेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आशिष पाटील आणि माजी सदस्य हेमंत नाईक यांनी केले. यावेळी डावीकडून निखिल पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज जाधव उपस्थित होते.