इचलकरंजीत भूमिगत गॅस पाइप लाईनला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 09:55 AM2023-05-07T09:55:39+5:302023-05-07T09:56:00+5:30

येथील पंचवटी चित्रमंदिर परिसरातून गेलेल्या भूमिगत गॅस पाइप लाईनला शनिवारी अचानकपणे आग लागली.

Underground gas pipeline fire in Ichalkaranjit | इचलकरंजीत भूमिगत गॅस पाइप लाईनला आग

इचलकरंजीत भूमिगत गॅस पाइप लाईनला आग

googlenewsNext

इचलकरंजी : येथील पंचवटी चित्रमंदिर परिसरातून गेलेल्या भूमिगत गॅस पाइप लाईनला शनिवारी अचानकपणे आग लागली. आगीत दोन दुचाकी आणि रस्त्याकडेला असलेले झाड जळाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

शहरातील विविध भागात भूमिगत गॅस पाइपलाईन द्वारे गॅस पुरवला जातो. अशीच पाइपलाईन पंचवटी चित्रमंदिर परिसरातून गेली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास या गॅस पाइपलाईनमधून अचानकपणे गॅस गळती सुरु होऊन आगीचा भडका उडाला. अचानकपणे घडलेल्या या घटनेने रस्त्यावरुन येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची तारांबळ उडाली. या आगीच्या ज्वाळा सुमारे 20 ते 25 फुटापर्यंत उंच होत्या.

रस्त्यालगत असलेल्या दोन दुचाकीलाही या आगीची झळ बसली. त्यात एक मोटरसायकल मोठ्या प्रमाणात जळाली, तर आणखीन एक मोटरसायकल व रस्त्याकडेचे मोठे झाड झळ लागून पेट घेतले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. घटनास्थळी बग्यांची मोठी गर्दी झाली होती. काहीजण मोबाईलवर फोटो व व्हिडिओ घेत होते. काही वेळेतच सोशल मीडियावर ही हे फोटो प्रसारित झाले. 

Web Title: Underground gas pipeline fire in Ichalkaranjit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.