अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:18 AM2019-01-11T01:18:58+5:302019-01-11T01:21:26+5:30

गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकºयांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.

Understand the final fight landed on the road: N. D. Patil | अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा : एन. डी. पाटील

अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा : एन. डी. पाटील

Next
ठळक मुद्देइरिगेशन फेडरेशनचा शेतकरी मेळावा२१ जानेवारीला सरकारला धडकी भरविणारा चक्का जाम

कोल्हापूर : गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकºयांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारीला पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदी पुलावर चक्का जाम आंदोलन होणार आहे. याच्या नियोजनासाठी गुरुवारी दुपारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला. प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संपतबापू पाटील, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे, माजी सभापती बाबासो पाटील-भुयेकर, मारुतराव जाधव, मारुती पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकार आश्वासन देत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून आंदोलनाची तारीख पुढे सरकत गेली. आता थांबणे शक्य नाही. शेतकºयांचा संताप वाढला आहे. वीज कनेक्शन तुटू नये म्हणून संयमाने घेतले; पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, पदरात पाडून घ्यायची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे शेतकºयांनी ताकदीने आंदोलनात उतरावे.

खासदार महाडिक म्हणाले, नुसती आश्वासने देणाºया सरकारला कोणाच्याच मागण्या मान्य करायच्या नाहीत, असे दिसत आहे. उद्योजकांना रस्त्यावर आणणाºया या सरकारने शेतकºयांनाही वाºयावर सोडले आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना उपाययोजना राहू देत, मृत्यूची आकडेवारीदेखील बाहेर जाऊ नये, याची दक्षता हे सरकार घेत आहे. या सरकारला घरी बसविण्याची हीच संधी आहे. आजचे मरण उद्यावर ढकलून चालणार नाही. तलवार शेतकºयांच्या मानेवर पडणार आहे.

माजी आमदार संपतबापू पाटील म्हणाले, सरकारकडे पैसे नाहीत आणि शेतकºयांकडेही नाहीत. दोघेही कंगाल आणि रिकामे आहेत. कंगालाकडून कसली वसुली करताय. सरकारने रिकाम्या माणसाला समजून घ्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. भगवान काटे यांनी कळणाºया भाषेतच आम्ही आंदोलने करतो, राज्यकर्त्यांना गांधीगिरी कळत नाही. हातात बुडका घेऊनच वठणीवर आणतो, असे सांगून ऊस बिलाचा पत्ता नाही आणि मग विजेची बिले कशी काय मागता? असा सवाल केला. आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मनोगत व्यक्त करताना चक्का जाम ताकदीने करण्याचे आवाहन केले.

साडेसतरा एचपीचा पंपच नाही, तर बिल कसे येते
साडेसतरा एचपीचा पंपच बाजारात उपलब्ध नाही, तरीही महावितरणकडून साडेसतरा एचपी पंपाची बिले शेतकºयांना काढली असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणून देताना राज्यातील ४२ लाखांपैकी केवळ ३५ हजार पंपांचीच बिले व मीटर रीडिंग जुळत आहे. उर्वरित बिले अंदाजे काढली जात आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात आणि विशेष म्हणजे पंप आणि ट्रान्स्फॉर्मर काढून ठेवलेला असतानाही १२५ युनिटचे बिल शेतकºयाला येते. ३0 टक्के गळती असताना ती १५ टक्के दाखविली जाते. एक टक्का म्हणजे ७00 कोटी, असा हिशेब धरला, तर १0 हजार ५00 कोटींची बोगस बिले काढली जातात. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकºयांची थकबाकी वाढविली जाते, हे सर्व ऊर्जा खात्यातील मंत्री, अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

महाडिक नको, राष्ट्रवादीचे म्हणा
धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना चक्का जाम आंदोलनात मोठ्या प्रमाणावर आणावे, असे इरिगेशन फेडरेशनचे कार्यकर्ते रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले. यावर खासदार महाडिक यांनी पटकन महाडिक नको राष्ट्रवादीची युवा शक्ती म्हणा, असे हळूच सांगितले. खासदारांना राष्ट्रवादीतून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर किती धसका घेतलाय, याचीच प्रचिती आली.

पवारांचेच सरकार येणार
आता पवारांचेच सरकार येणार आहे, त्यांनी
माफी द्यायचे मान्य केले आहे. मग कशाला आमच्या डोक्यावर बसलाय? असे स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत म्हटल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले.


महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारीला पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदी पुलावर चक्का जाम आंदोलन होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी गुरुवारी दुपारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला. यावेळी प्रा. एन. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. डावीकडून मारुतराव जाधव, विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, खासदार धनंजय महाडिक, प्रताप होगाडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Understand the final fight landed on the road: N. D. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.