फलटण तालुक्यातील ओढ्यातून विनापरवाना वाळू उपसा; संबंधित वाळू तस्करांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:12 AM2020-01-31T11:12:48+5:302020-01-31T11:14:05+5:30
फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करून वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून विनापरवाना वाळूचा उपसा करीत आहेत.
जिंती : फलटण तालुक्यातील जिंती व साखरवाडी भागात वाळूमाफिया ओढे, नीरा नदीकाठ व शेतकरी महामंडळाच्या शेतातील अवैधपणे वाळूचा उपसा करीत असल्याचे उघडकीस येत आहे. वाळू चोरी होत असल्याबाबत तलाठी व मंडलाधिकाऱ्यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतक-यांमधून केला जात आहे.
फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करून वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून विनापरवाना वाळूचा उपसा करीत आहेत. तांबेवस्ती, बिरोबा मंदिराजवळ व जोशी वस्तीलगतच्या ओढ्यातून दिवसाढवळ्या व रात्री मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळूचा तुटवडा असल्याने वाळूमाफियांकडून शेतकºयांना दमदाटी केली जाते.
ओढ्याच्या पात्रांमधून दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे.
साखरवाडी भागात रात्रंदिवस हायवा व ट्रॉलीने वाळूची वाहतूक होत आहेत. वाळू उपशामुळे येथील परिसरातील रस्ते, ओढ्यालगतच्या शेतीची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा संबंधित विभागांकडे तसेच तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे यामध्ये मोठ्या अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महसूल, पाटबंधारे, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांकडे कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्हाधिका-यांनी लक्ष घालण्याची गरज
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करी फोफावली आहे. याबाबत जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाºयांनीच लक्ष घालण्याची गरज आहे. विविध भागातील ग्रामपंचायती किंवा संबंधित शेतकºयांच्याकडून अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या असतानाही महसूल विभागही डोळे असून आंधळ्याची भूमिका घेऊन बसले आहेत. यामुळे वाळूमाफियांचे पैशाच्या व मनगटाच्या बळावर वर्षभरापासून पेव फुटले आहे. नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.