ओबीसी आरक्षण पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:46+5:302021-07-04T04:16:46+5:30
कोल्हापूर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा, देशातील ओबीसींची जातवार जनगणना झालीच पाहिजे, महाज्योतीला १ हजार कोटी मिळाले ...
कोल्हापूर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा, देशातील ओबीसींची जातवार जनगणना झालीच पाहिजे, महाज्योतीला १ हजार कोटी मिळाले पाहिजेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाल सुतार समाजाने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
या निवेदनात ओबीसींना सक्ती केेलेली नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, उच्च शिक्षणात आरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी, राज्य सरकारच्या सेवेतील भरती पूर्ण करावी, विदेशी उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप सुरु करावी, आश्रमशाळा सुरू कराव्यात, मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी तसेच लोकसभा व विधानसभेसाठी २७ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी कऱण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी, सागर सुतार, रामचंद्र सुतार, जितेंद्र लोहार, कृष्णात सुतार, अभिजीत सुतार, विश्वनाथ सुतार, मारुती सुतार, मनोज लोहार, श्रीकांत सुतार उपस्थित होते.
---
फोटो ०३०७२०२१-कोल-पांचाल समाज
ओळ : कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाल सुतार समाजाच्यावतीने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
-