बेरोजगारी हेच शाहूवाडीत रुग्णसंख्या वाढीचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:12 PM2020-05-26T23:12:49+5:302020-05-26T23:13:13+5:30

या तालुक्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असा उद्योग उभा राहिला नाही. दिवंगत नेते उदयसिंहराव गायकवाड यांना कोल्हापूर जिल्'ाने भरभरून राजकीय ताकद दिली. पाचवेळा खासदार केले. ते मुळचे या तालुक्याचे परंतु त्यांनीही तालुक्याचा पांग फेडला नाही. त्यांनी उभा केलेला साखर कारखानाही नीट चालवता आला नाही.

 Unemployment is the reason for the increase in the number of patients in Shahuwadi | बेरोजगारी हेच शाहूवाडीत रुग्णसंख्या वाढीचे कारण

बेरोजगारी हेच शाहूवाडीत रुग्णसंख्या वाढीचे कारण

Next
ठळक मुद्दे पोटापाण्याची अडचण असल्याने शेतीत गुंतवणूक करता येत नाही, असे एक ना अनेक प्रश्न पायात बेडी बनून घट्ट बसले आहेत.

विश्वास पाटील-

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने गेल्या काही दिवसांत कोल्हापूर जिल्'ातच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईतही शाहूवाडी तालुका चर्चेत आला आहे. रोजगारासाठी मुंबईसह अन्य शहरांत झालेले मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हेच वाढलेल्या रुग्णसंख्येचे मुख्य कारण आहे. प्रचंड पाऊस, भरपूर पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती व खनिज संपत्तीने नटलेला असा हा तालुका अनेक बाबतीत मागे राहिला.

साधारणत: १९६० ते ८० च्या दोन दशकांत जे लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईला जवळ केले, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच मागे आल्या नाहीत. त्यांनी मागे यावे असे विकासाचे वारेही तालुक्यात वाहिले नाही. तालुक्याचा विकास झाला पाहिजे, गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळाले पाहिजे, अशी इच्छाशक्ती असणारे नेतृत्व तालुक्यास लाभले नाही, त्यामुळे विकासाच्या लाटेत हा तालुका मागे राहिल्याचे वास्तव आहे.शाहूवाडी तालुक्यातील ११४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत दोन हजारांहून जास्त लोक आले आहेत. हे सर्व मुख्यत: रोजगार व उदरनिर्वाहासाठी मुंबईत गेले आहेत. ते मुंबईहून गावी आल्याने त्यांच्यातील काहीजण कोरोनाबाधित झाले. परंतु त्या निमित्ताने सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या.

शाहूवाडीत जास्त लोक बाधित झाले; कारण या तालुक्यातील स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे. स्थलांतर जास्त आहे; कारण बेरोजगारी जास्त आहे. दहावी-बारावी झाली की मुले नोकरीच्या शोधात गाववाल्याच्या ओळखीने मुंबईला जातात. या तालुक्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असा उद्योग उभा राहिला नाही. दिवंगत नेते उदयसिंहराव गायकवाड यांना कोल्हापूर जिल्'ाने भरभरून राजकीय ताकद दिली. पाचवेळा खासदार केले. ते मुळचे या तालुक्याचे परंतु त्यांनीही तालुक्याचा पांग फेडला नाही. त्यांनी उभा केलेला साखर कारखानाही नीट चालवता आला नाही.

वारणा नदीवरून पाणी योजना करून भाडळे खिंडीत पाणी आणा अशी त्या परिसरातील जनतेची मागणी होती. जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष असलेल्या मानसिंग गायकवाड यांना ते सहज शक्य होते, परंतु विकासाची दृष्टी तिथेही आड आली. दिवंगत माजी आमदार संजय गायकवाड यांनी एमआयडीसीचा प्रकल्प मंजूर केला होता, परंतु तिथे उद्योग उभा राहिला नाही. माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडून मका प्रकल्प शेअर्स भांडवल गोळा करण्यापुरताच मर्यादित राहिले. आमदार विनय कोरे यांनीही प्रत्येक निवडणुकीत वारणेसारख्या विकासाचे स्वप्न दाखविले, परंतु मूळ वारणेचेच विकासाचे शिल्प अडचणीत आल्याने शाहूवाडी पुन्हा विकासापासून लांब राहिली.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी फळप्रक्रिया उद्योगाला बळ देण्याच्या घोषणा केल्या; परंतु त्यांनीही प्रत्यक्षात काही करून दाखविले नाही. त्यांचा विकास बांबवडेत भात परिषदेपुरताच मर्यादित राहिला. अन्य पिके कमी पिकत असली तरी तालुक्यात राजकारणाचे पीक मात्र जोमात आहे. त्यातून पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. भांडळे खिंड ते भेडसगांवपर्यंतचा पूर्व भाग चांगला विकसित आहे. परंतु आंबा-विशाळगड ते उदगिरी पर्यंतचा प्रदेश डोंगराळ आणि जंगलमय आहे. तेथील जनतेचे पाय अजूनही करवंदाच्या काट्यांनी रक्तबंबाळ होतात, हे वास्तव आहे.

मुबलक पाणी आहे परंतु जमीन हलक्या दर्जाची आहे. वर्ग दोनच्या जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या विकसित होण्यात अडचणी आहेत. पोटापाण्याची अडचण असल्याने शेतीत गुंतवणूक करता येत नाही, असे एक ना अनेक प्रश्न पायात बेडी बनून घट्ट बसले आहेत.

शाहूवाडी तालुक्यातील किती लोक मुंबईत :

सुमारे ६० हजारांपर्यंतमुंबईत शाहूवाडीकर काय करतो..हॉटेल-बेकरीमध्ये रोजगार : ५० टक्केस्वत:चे दुकान, चहा किंवा खाद्यपदार्थ हॉटेल, पानटपरी, भाजी विक्री : २० टक्केचांगली खासगी नोकरी किंवा सरकारी नोकरीत : १५ टक्केछोटे-मोठे उद्योग स्वत: करणारे : १० टक्केमाथाडी, हमाल अशी कामे करणारा वर्ग :

०५तालुक्यातील औद्योगीकरणाचे प्रकल्प

बांबवडे येथील उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना : रोजगार - ७०० विश्वासराव नाईक साखर कारखाना चिखली- उद्योग अन्य तालुक्यात पण रोजगार-२५०एमआयडीसी मंजूर; परंतु उद्योग उभा राहिला नाहीमाजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा बहिरेवाडी येथील मका प्रकल्प : सुरूच झाला नाहीतालुक्यातील मुख्य पिके : भात, ऊस, मका, नाचणी, रताळीआंबा-विशाळगड परिसरात पर्यटनाला वाव परंतु त्याची दृष्टी व नावीन्य नाही.बर्की येथील धबधबा प्रसिध्द परंतु भाजलेली मक्याची कणसे आणि भजी या पलीकडे विकास नाही.

शाहूवाडी तालुका : गावे १४५लोकसंख्या : १,८५ हजार ६६१ (२०११ च्या जनगणनेनुसार) त्यापैकी ५३३९ नागरी लोकसंख्यासाक्षरता दर : ७२.६८दूध संकलन : फक्त गोकुळ : ५३ हजार, कोल्हापूर जिल्'ांत नवव्या क्रमांकावरपाटबंधारे प्रकल्प : वारणा (चांदोली येथे): ३४.५० टीएमसी.कडवी (भेंडवडे)- २.७१, कासारी (गेळवडे) : २.७७लपा तलाव (२०० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता) - एकूण १०कांडवण, मानोली, पालेश्वर, मानोली, कुंभवडे, केसरकरवाडी, चांदोली, भंडारवाडी, बुरंबाळी, बर्की, नांदारी.सरासरी पाऊस : ६ हजार मिलीमीटर-कासारी परिसर, वारणा परिसर : अडीच हजार मिलीमीटर.प्राथमिक आरोग्य केंद्रे : ०७ (सरासरी ३० किलोमीटरच्या परिघातील गावे समाविष्ट)माध्यमिक विद्यालये : ४३, प्राथमिक शाळा : २४०तालुक्यात ८० धनगरवाडे त्यातील सुमारे ८५ टक्के लोक नोकरी, रोजगारासाठी स्थलांतरित.

Web Title:  Unemployment is the reason for the increase in the number of patients in Shahuwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.