अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाची रोख रक्कम व दागिने असलेली १२ लाखाची बॅग केली लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:40 PM2022-01-04T19:40:41+5:302022-01-04T19:41:21+5:30

किरकोळ खरेदीसाठी कटलरी दुकानासमोर दुचाकी थांबवली असता घडला प्रकार.

Unidentified thieves snatched a bag of cash and jewelery worth Rs 12 lakh from a goldsmith | अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाची रोख रक्कम व दागिने असलेली १२ लाखाची बॅग केली लंपास 

अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाची रोख रक्कम व दागिने असलेली १२ लाखाची बॅग केली लंपास 

googlenewsNext

कागल :  दुचाकी गाडी दुकानासमोर लावून कटलरी दुकानात खरेदीसाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाच्या दुचाकीतील रोख रक्कम व दागिने असणारी १२ लाख ४८ हजार रूपये किंमतीची बॅग लंपास केली आहे. आकाश ज्योतीबा घाटगे (मुळ गाव शाहुपुरी. कोल्हापुर. सध्या रा. निपाणी वेस  कागल) यांनी याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. 

याबाबत माहिती अशी की, आकाश ज्योतीबा घाटगे हे सराफ व्यावसायिक आहेत. दुकान बंद करुन घरी जात असतानाही किरकोळ खरेदीसाठी त्यांनी कागल पोलीस ठाण्याच्या प्रवेश कमानीसमोर असलेल्या कटलरी दुकानासमोर आपली दुचाकी थांबवली. गाडी सुरूच ठेवून ते दुकानात गेले होते. 

खरेदी करुन झाल्यानंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना दुचाकीच्या डिक्कीत रोख रक्कम आणि दागिने असणारी बॅग नसल्याचे लक्षात आले. कटलरी दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा चोरीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Unidentified thieves snatched a bag of cash and jewelery worth Rs 12 lakh from a goldsmith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.