मुरगूड पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:45 AM2021-02-18T04:45:03+5:302021-02-18T04:45:03+5:30

या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष राजेखान जमादार व सिध्दिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. ...

A unique initiative of Murgud Police Station | मुरगूड पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम

मुरगूड पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम

Next

या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष राजेखान जमादार व सिध्दिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. संदीप पाटील होते, तर सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहा पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, गणेश पाटील, पालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड प्रमुख उपस्थित होते. नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, कोरोनाकाळात रस्त्यावर उतरून कार्य करणाऱ्या मुरगूड पोलिसांकडून लोकांचे आरोग्य संरक्षणासाठी मोफत आरोग्य शिबिर भरवणे, ही राज्याला आदर्श अशी गोष्ट आहे. सिध्दिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई म्हणाले की, कोरोनाने बऱ्याच गोष्टी शिकविल्या आहेत. त्यागी वृत्तीने आरोग्याकडे लक्ष दया. प्रामाणिक सल्ला देणारा खरा डॉक्टर महत्त्वाचा आहे.

यावेळी डॉ. भगवान डवरी, पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे, डॉ. संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात कोविडच्या दडपणाखाली जनमानसात ताणतणाव वाढल्याने धकाधकीच्या जीवनात डायबेटीस व हृदयरोग वेळीच रोखण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांची गरज असल्याचे सांगितले. या शिबिरप्रसंगी डॉ. सूर्यकांत बरकाळे, डॉ. सचिन भारमल, डॉ. संजय रामशे, डॉ. रवी कुमार पाटील उपस्थित होते. डॉ़. तानाजी हरेल यांनी सूत्रसंचालन, तर आभार स्वप्नील मोरे यांनी मानले.

फोटो ओळ : मुरगूड (ता कागल) येथे पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना नगराध्यक्ष राजेखान जमादार, डॉ. संजय देसाई, डॉ. संदीप पाटील, सपोनि विकास बडवे, किशोरकुमार खाडे.

Web Title: A unique initiative of Murgud Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.