तुळशीच्या पाण्याने साधला अनोखा विक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:06+5:302021-07-27T04:25:06+5:30
योग्य पाणी नियोजनाचे व भविष्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठीचा आराखडा तयार करून एप्रिल, मे व जून महिन्यामध्ये धरणातील पाणी सोडले ...
योग्य पाणी नियोजनाचे व भविष्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठीचा आराखडा तयार करून एप्रिल, मे व जून महिन्यामध्ये धरणातील पाणी सोडले होते. यामुळे तुळशी नदी काठावरील पिण्याच्या पाण्याबरोबर शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. धरण रिकामे झाल्यानेच इतका विक्रमी पाऊस लागूनही आज आखेर धरण शंभर टक्के भरलेले नाही. त्यामुळे कालच्या पुराची तीव्रता कमी झाली. पण सध्या धरणात येणारे पाणी, पंचगंगेच्या पुराची कमी झालेली तीव्रता व भविष्यातील पाऊस याचा विचार करून आज तुळशी जलाशयाच्या तीन वक्राकार दरवाजातून १०१६ क्युसेक्स वेगाने पाणी तुळशी नदी पात्रात प्रवाहित करण्यात आले.
फोटो ओळी - धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी धरणाच्या वक्राकार दरवाजातून सोडण्यात आलेले पाणी.
छाया - राम पाटील / श्रीकांत ऱ्हायकर