चंदगडमध्येही कुपेकर गटाची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:12 PM2021-03-19T15:12:04+5:302021-03-19T15:13:35+5:30

Gokul Milk Elecation Chandgad Kollhapur-गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकीची मूठ बांधली. गोकुळसह आगामी सर्व निवडणुका एकजुटीने व ताकदीने लढण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे.

The unity of the Kupekar group in Chandgad too | चंदगडमध्येही कुपेकर गटाची एकजूट

चंदगड येथे झालेल्या कुपेकर गटाच्या बैठकीत बाबूराव हळदणकर यांनी मार्गदर्शन केले. समोर उपस्थित कार्यकर्ते.

googlenewsNext
ठळक मुद्देचंदगडमध्येही कुपेकर गटाची एकजूटबैठकीत निर्धार : आगामी निवडणुका ताकदीने लढविणार

गडहिंग्लज : गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकीची मूठ बांधली. गोकुळसह आगामी सर्व निवडणुका एकजुटीने व ताकदीने लढण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे.

चंदगड येथील सोयरिक मंगल कार्यालयात ही बैठक झाली. तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अचानक विधानसभेच्या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर आलेली मरगळ झटकून त्यांचे समर्थक पुन्हा एकत्र आल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

माजी जि. प. सदस्य बाबूराव हळदणकर म्हणाले, कुपेकर गट म्हणजे एक कुटुंब आहे. कुटुंबातील एकी कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. गणेश फाटक म्हणाले, नंदाताई लवकरच पुन्हा राजकारणात सक्रीय होतील. गोकुळ, केडीसीसी, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील. विलास पाटील म्हणाले, नंदाताई पुन्हा सक्रीय होणार असतील तर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. विष्णू गावडे म्हणाले, संध्यादेवी व नंदाताई यांच्यामुळेच सामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काम करण्याची संधी मिळाली.

यावेळी निंगू भादवणकर, प्रताप डसके, दत्तू विंझणेकर, बबन देसाई व बंडोपंत रावराणे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस भैरू खांडेकर, रघुनाथ नाकाडी, नागोजी नाईक, दिपक चांदेकर, मधुकर मोटार, नारायण गावडे, रवळनाथ गावडे, सुनिल देसाई, संजय राऊत, अजित गावडे, दौलत दळवी, अजमल नाईक, शाहरूख व्यापारी, अरीफ खेडेकर, ईस्माईल शहा, झाकीर नाईक, अब्दुल मुल्ला, शिवराज देसाई, आप्पाजी गावडे, आनंदराव भोसले, सागर पाटील, विनोद पाटील, बसवंत अडकूरकर, विलास चव्हाण, सचिन दळवी, संतोष गावडे आदी उपस्थित होते.

निष्ठावंतांना सापत्नाची वागणूक

स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी चंदगडमध्ये राष्ट्रवादीचा पाया घातला. त्यांच्या पश्चात संध्यादेवी व नंदातार्इंनी पक्षाची मजबूत बांधणी केली, त्यांच्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळाला. परंतु, अलिकडच्या काळात कुपेकर गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. यासंदर्भात लवकरच शिष्टमंडळाने वरिष्ठांची भेट घेणार आहोत, असे तजमुल फणीबंद यांनी सांगितले.

 

Web Title: The unity of the Kupekar group in Chandgad too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.