‘जलयुक्त विद्यापीठ’ संकल्पनेवर विद्यापीठाची दिनदर्शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:16 PM2020-01-15T12:16:21+5:302020-01-15T12:17:31+5:30

शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

University Calendar on the concept of 'Water University' | ‘जलयुक्त विद्यापीठ’ संकल्पनेवर विद्यापीठाची दिनदर्शिका

शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. भारती पाटील यांच्यासह अन्य अधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्दे‘जलयुक्त विद्यापीठ’ संकल्पनेवर विद्यापीठाची दिनदर्शिका

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठ गेल्या चार वर्षांपासून विविध विषयांवर आधारित दिनदर्शिका सादर करीत आहे. त्याचप्रमाणे दैनंदिनीही पाच वर्षांपासून प्रकाशित करण्यात येत आहे. ‘जलयुक्त शिवाजी विद्यापीठ’ या विषयावर आधारित सन २०२० ची दिनदर्शिका सादर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दैनंदिनीचे स्वरूपही अधिक आकर्षक करण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमांचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.

यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, दैनंदिनी समितीच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव, आयक्यूएसी संचालक डॉ. आर. के. कामत, डॉ. विजय ककडे, डॉ. अक्षय सरवदे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभा अंत्रेडी, माणिक कदम, डॉ. पी. एस. पांडव, डॉ. वैभव ढेरे, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: University Calendar on the concept of 'Water University'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.