चुकीची माहिती दिल्यावरून विद्यापीठ विकास आघाडीकडून सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 07:26 PM2020-12-30T19:26:16+5:302020-12-30T19:29:44+5:30

Shivaji University Kolhapur- उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक संदिग्ध उत्तरे, तसेच चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेचा (सिनेट) बुधवारी त्याग केला.

University Development Front resigns due to misinformation | चुकीची माहिती दिल्यावरून विद्यापीठ विकास आघाडीकडून सभात्याग

चुकीची माहिती दिल्यावरून विद्यापीठ विकास आघाडीकडून सभात्याग

Next
ठळक मुद्देप्रश्न नाकारल्याने सुटाचा बहिष्कार सिनेटमध्ये वादळी चर्चा

कोल्हापूर : उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक संदिग्ध उत्तरे, तसेच चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेचा (सिनेट) बुधवारी त्याग केला.

परिनियमानुसार प्रश्न विचारूनही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ते नाकारल्याचे कारण पुढे करीत विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) प्रश्नोत्तरांच्या तासावर बहिष्कार टाकला. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. विविध अधिविभागांमधील राजकारण आणि वाद, विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या संघटनांना काही अधिकाऱ्यांकडून बळ मिळत असल्याच्या मुद्यांवर अधिसभेत वादळी चर्चा झाली.  सभागृहाबाहेर प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
​​​​​​
विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी बारा वाजता सभा सुरू झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते.

दरम्यान, विहित मुदतीत सादर केलेले प्रश्न नाकारण्याचे कारण सुटा सदस्यांनी विचारले. पण, त्याबाबत चर्चा होणार नाही, असे कुलगुरूंनी सांगितले. त्यावर सुटाच्या अशोककुमार पाटील, इला जोगी, निलकंठ खंदारे, मनोज गुजर, राजेंद्र थोरात, अलका निकम यांनी प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार टाकला. प्रश्नोत्तराच्या तासात विकास आघाडी, सुटाने सभात्याग करण्याची घटना पहिल्यांदाच घडली.

Web Title: University Development Front resigns due to misinformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.