विद्यापीठातील खासगी सुरक्षारक्षकांचे ‘कामबंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:39+5:302021-01-22T04:23:39+5:30
कोल्हापूर : भविष्य निर्वाह निधीच्या फंडाच्या वर्गणीची पावती आणि ईएसआयसीचे कार्ड मिळावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठातील खासगी सुरक्षारक्षकांनी बुधवारी ...
कोल्हापूर : भविष्य निर्वाह निधीच्या फंडाच्या वर्गणीची पावती आणि ईएसआयसीचे कार्ड मिळावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठातील खासगी सुरक्षारक्षकांनी बुधवारी रात्री बारानंतर कामबंद आंदोलन केले. विद्यापीठाने सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. दर महिन्याला या सुरक्षारक्षकांच्या वेतनातून सुमारे अडीच हजार रूपये भविष्य निर्वाह निधीची वर्गणी म्हणून कपात केली जाते. मात्र, त्याच्या आणि वेतनाच्या पावत्या दिल्या जात नाहीत. युव्हीएन क्रमांकही दिलेला नाही. या पावत्या, ईएसआयसी कार्ड आणि युव्हीएन क्रमांक मिळावा, या मागणीसाठी या सुरक्षारक्षकांनी कामबंद आंदोलन केले. या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची सूचना संबंधित खासगी कंपनीला केली जाईल, अशी ग्वाही कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिल्यानंतर गुरूवारी या सुरक्षारक्षकांनी आंदोलन स्थगित केले.