विद्यापीठ रस्त्यावर टोळक्याने मारहाण करून युवकास लुटले

By Admin | Published: October 23, 2014 11:02 PM2014-10-23T23:02:07+5:302014-10-23T23:06:08+5:30

घटना बुधवारी रात्री शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर घडली

The university robbed the street and beat the youth | विद्यापीठ रस्त्यावर टोळक्याने मारहाण करून युवकास लुटले

विद्यापीठ रस्त्यावर टोळक्याने मारहाण करून युवकास लुटले

googlenewsNext

कोल्हापूर : मैत्रिणीसोबत बोलत उभ्या राहिलेल्या तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी डोक्यावर प्रहार करून त्याच्याकडील दीड तोळ्यांची सोन्याची चेन, सहा हजार रुपये व दोन मोबाईल असा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना काल, बुधवारी रात्री शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर घडली. याबाबतची फिर्याद अमर धनाजी मोरे (वय २४, रा. जुनी एमआयडीसी श्रीनगर कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) याने राजारामपुरी पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील अमर मोरे हा तरुण दुचाकीवरून कावळा नाक्याकडे कामानिमित्त गेला होता. काल रात्री काम आटोपून तो घरी परतताना शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून सरनोबतवाडी नाक्याच्या पुढील रस्त्यावर त्याची मैत्रीण उभी होती तिला बघून तो थांबला. त्याचवेळी ट्रॅकसूट परिधान केलेले तिघे तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी अमरला ‘तू अक्षा आहेस काय?’ असे म्हणू लागले. त्यावेळी ‘मी अक्षा नाही’, असे अमरने सांगितल्यावर त्यातील एकाने टणक वस्तूने त्याच्या डोक्याजवळ प्रहार केला. यावेळी अज्ञातांनी त्याच्याजवळील दीड तोळ्यांची सोन्याची चेन, सहा हजार रुपये, तसेच त्याचा व त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल घेऊन अज्ञात तरुण दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर अमर मोरे याने पोलिसांत फिर्याद दिली.
या प्रकरणी अज्ञातांविरोधात जबरी चोरी व मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरने तिघा तरुणांपैकी दोघेजण पाच फूट सहा इंच, तर एक पाच फूट एक इंच उंच होता, असे वर्णन सांगितले असून, तिघेही ट्रॅकसूटमध्ये होते.
यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, सोन्याची चेन असा सुमारे ४२ हजार ५०० रुपये चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)

४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला
दीड तोळ्यांची सोन्याची चेन, सहा हजार रुपये व दोन मोबाईल, असा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद अमर मोरे याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: The university robbed the street and beat the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.