कळे येथे विनापरवाना दहा लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:25 AM2021-03-17T04:25:58+5:302021-03-17T04:25:58+5:30
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पन्हाळा तालुक्यातील कळे गावात एका घरावर छापा टाकून सुमारे १० लाख १६ हजार ...
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पन्हाळा तालुक्यातील कळे गावात एका घरावर छापा टाकून
सुमारे १० लाख १६ हजार रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपन्यांचा देशी-विदेशी दारूचा विनापरवाना साठा जप्त केला. याप्रकरणी विजय कृष्णा देसाई (वय ४९, रा. कळे ता. पन्हाळा) याला अटक केली. हा गुन्हा कळे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळे येथे विजय देसाई याच्या घरी देशी-विदेशी दारीचा विनापरवाना मोठा साठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी संबंधित घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० लाख १६ हजार ७३२ रुपये किमतीचे विविध कंपनीच्या देशी-विदेशी दारूचे २७६ बॉक्स जप्त केले. पोलिसांनी देसाई यालाही अटक केली. त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फोटो नं. १६०३२०२१-कोल-पोलीस ॲक्शन
फोटो नं. स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने कळे (ता. पन्हाळा) येथे छापा टाकून सुमारे दहा लाख रुपये किमतीचा विनापरवाना देशी-विदेशी दारूसाठा जप्त केला.