भारतीय खो-खो महासंघाची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:19+5:302021-06-29T04:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारतीय खो-खो महासंघाची निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्राकडून संयुक्त सचिवपदी शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारतीय खो-खो महासंघाची निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्राकडून संयुक्त सचिवपदी शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते व महाराष्ट्राचे माजी सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव (उस्मानाबाद) तर कार्यकारिणी सदस्यपदी राष्ट्रीय पुरस्कार छाननी समिती सदस्य, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा (औरंगाबाद) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी राजेश टंडन यांनी ही माहिती दिली.
या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. अरुण देशमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष : सुधांशू मित्तल (दिल्ली), जनरल सेक्रेटरी : महेंद्रसिंह त्यागी (दिल्ली), खजिनदार : सुरेंद्रकुमार भुतियानी (उत्तरांचल), उपाध्यक्ष : भंवरसिंह पलाडा (राजस्थान), कमलजीत आरोरा (छत्तीसगड), लोकेश्वरा (कर्नाटक), एम. सीतारामी रेड्डी (आंध्र प्रदेश), मधुसूदन सिंह (मणिपूर), राणी तिवारी (हरियाणा), सहसचिव : डॉ. चंद्रजीत जाधव (महाराष्ट्र), नेल्सन सॅम्युएल (तामिळनाडू), संजय यादव (मध्य प्रदेश), उपकारसिंह विर्क (पंजाब), कार्यकारिणी सदस्य : गोविंद शर्मा (महाराष्ट्र), आफताब हुसेन (आसाम), ब्रिश भान (हरियाणा), देवीदत्त तन्वर (हिमाचल), जी. राधाकृष्णन नायर (केरळ), गुरचंद सिंह (पंजाब), हरभूषण गुलाटी (चंदिगड), एल. आर. वर्मा (हिमाचल), व्ही. एस. प्रसाद (आंध्र), नीरज कुमार (बिहार), प्रदूमन मिश्रा (ओरिसा), रवींद्रनाथ बारीक (पश्चिम बंगाल), रजत शर्मा (उत्तरांचल), संतोष गरुड (गुजरात) यांचा समावेश आहे.
फोटो : २८०६२०२१- कोल- गोविंद शर्मा निवड
फोटो : २८०६२०२१- कोल- चंद्रजीत जाधव निवड