‘लोकमत महामॅरेथॉन’ ला अभूतपूर्व प्रतिसाद; ‘सोशल मीडिया’वर धूम; दिवसभर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 05:33 PM2019-01-07T17:33:56+5:302019-01-07T17:44:23+5:30
‘विन्टोजीनो’ प्रस्तुत आणि माणिकचंद आॅक्सीरिच, ट्रेडनेट वेल्थ सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कडाक्याची थंडी असतानाही रविवारी (दि. ६) पहाटे धाव घेऊन, कोल्हापूरकरांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी साद दिली. या महामॅरेथॉनच्या ‘लोकमत’च्या अंकात सोमवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्या, छायाचित्रे, मॅरेथॉनदिवशी टिपलेली छायाचित्रे अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला.
कोल्हापूर : ‘विन्टोजीनो’ प्रस्तुत आणि माणिकचंद आॅक्सीरिच, ट्रेडनेट वेल्थ सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कडाक्याची थंडी असतानाही रविवारी (दि. ६) पहाटे धाव घेऊन, कोल्हापूरकरांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी साद दिली. या महामॅरेथॉनच्या ‘लोकमत’च्या अंकात सोमवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्या, छायाचित्रे, मॅरेथॉनदिवशी टिपलेली छायाचित्रे अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला.
शिस्तबद्धता, जल्लोषी वातावरण, उत्कृष्ट नियोजनामुळे ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी कोल्हापूरकर आणि धावपटूंनी या स्पर्धेचा आनंद लुटला. त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. या महामॅरेथॉनचे नियोजन, संयोजनाबाबतधावपटू, नागरिक आणि मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
या मॅरेथॉनमध्ये स्पर्धक, त्यांचे पाठीराखे आणि प्रेक्षक म्हणून सहभागी झालेले धावपटू, खेळाडू आणि नागरिकांनी महामॅरेथॉनच्या मार्गावर आणि पोलीस ग्राऊंडमध्येआपापले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसह टिपलेली छायाचित्रे, घेतलेले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘लोकमत’मधील महामॅरेथॉनच्या बातम्या, छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर केली; त्यामुळे सोशल मीडियावर महामॅरेथॉनची सोमवारी धूम राहिली.
कोल्हापूरमध्ये दिवसभर महामॅरेथॉनची चर्चा सुरू राहिली. दरम्यान, या स्पर्धेचे परीक्षण कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अॅथलेटिक्स् असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांनी केले. त्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव सुरेश फराकटे, एस. व्ही. सूर्यवंशी, आर. व्ही. शेडगे, पी. एम. पाटील-मांगोरे, कृष्णात लाड, विजय मळगे, अमोल आळवेकर, राहुल मगदूम, महेश सूर्यवंशी, सीमा सूर्यवंशी, अभिषेक भोपळे, नवनाथ पुजारी, विक्रम शेलार, लहु अंगज, युवराज मोळे, राहुल डिग्रजे, जगन्नाथ पोतदार, नरेंद्र वरूडकर, जालेंद्र मेढे, सचिन कोरवी, अभिजित पोवार, सत्यश्री सुतार, मनुकर समर्थ, डी. सी. पाटील, डी. के. रायकर, संकेत पाटील, बळीराम पाटील, ए. ए. कांबळे, विश्वास जगदाळे, चिन्मय जोशी, निखिल भारती, संजय पाटील, साताप्पा चव्हाण, संजय गाडेकर, भाऊसो बाबर, जितेंद्र वसगडेकर, अविनाश बोडके, प्रवीण पडवळ, शुभम पाटील, निखिल चौगुले, संदीप खोत, आकाश जाधव, धनंजय सावंत, अमित दलाल, मानसिंग मांगोरे, उदय पाटील, व्यंकटेश अपगोळ, प्रशांत शेटके, सूरज मगदूम यांचा समावेश होता.
‘लोकमत महामॅरेथॉन’ ही खेळाडू, नागरिकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेची तारीख निश्चित व्हावी, अशी अपेक्षा खेळाडूंमधून व्यक्त होत आहे.
- डॉ. सुरेश फराकटे,
सचिव, कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अॅथलेटिक्स् असोसिएशन.