इचलकरंजी वस्त्रोद्योगात अस्वस्थता
By admin | Published: September 20, 2014 12:09 AM2014-09-20T00:09:22+5:302014-09-20T00:09:22+5:30
कापड बाजारातील आर्थिक टंचाई : दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट
राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील यंत्रमाग उत्पादित कापडाचे घसरलेले भाव आणि कापड बाजारात निर्माण झालेली आर्थिक टंचाई यामुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट पडल्याने यंत्रमागधारक व कापड व्यापारी वर्ग हवालदिल झाले आहेत.
गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून कापडाला चांगली मागणी आली आणि साध्या यंत्रमागापासून सेमी आॅटो व आॅटो लूमच्या उद्योजकांच्या कापडाला उत्तम दर मिळाला. जॉब वर्क (मजुरी) करणाऱ्या आॅटो यंत्रमागधारकांनाही प्रतीमीटर १६ ते १७ पैसे मजुरी मिळाली; पण मार्च २०१४ नंतर सेमी आॅटो व आॅटो लूम कारखानदारांचा पुन्हा जॉब रेट उतरला. त्याही परिस्थितीत काहीसा परवडणारा जॉब रेट मिळत असल्याने चार-पाच महिने आॅटो लूमचे कारखाने चालू राहिले.
आॅटोलूमधारकांना पूर्वी प्रती वार्षिक सरासरी १६ ते १७ पैसे मीटरमागे मजुरी मिळत असे; पण यंदा मजुरीची सरासरी १३ ते १४ पैसेच राहिली आहे. त्यातच सध्या कापडाची मागणी एकदमच कमी झाली आणि जॉब रेट उतरला. सिमको लूमसाठी १३ ते १५ पैसे, रूटी-सीला ११ ते १३ पैसे, रॅपिअर लूमकरिता १० ते १३ पैसे व एअरजेट लूमसाठी १२ ते १४ पैसे प्रती मीटर मजुरी मिळत आहे. त्यामुळेच या लूमधारकांना दरररोज नुकसान सोसावे लागत आहे. शहर व परिसरात असलेल्या आॅटोलूमधारकांना दररोज पाच लाख रुपयांचा फटका बसत असल्याने खळबळ माजली आहे.
दसरा-दिवाळीच्या हंगामातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असली, तरी निवडणुकीचा फारसा परिणाम कापड बाजारावर होणार नाही. कापड उद्योगातील बड्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील पैसा ‘रियल इस्टेट’कडे वळविला आहे. परपेठांमध्ये विकलेल्या कापडाचे पैसे (पेमेंट) उशिराने मिळत आहे. हा कालावधी वाढत जाऊन ऐन दिवाळीत आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. दसरा-दिवाळी सणामध्ये कामगारांना देण्यासाठी आणि घर खर्चाकरिता यंत्रमागधारक व कापड व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. मात्र, सध्या असलेल्या आर्थिक टंचाईने वस्त्रोद्योगामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा उद्योजक व व्यापाऱ्यांना वाटत होती. तीन महिने होत आल,े तरी कापड बाजारातील परिस्थिती सुधारण्याऐवजी आर्थिक मंदी आल्याने उद्योजक, व्यापारी, व्याव्यावसायिक हवालदिल
झाले आहेत.
वस्त्रोद्योगात अस्वस्थता
कापड बाजारातील आर्थिक टंचाई : दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट
राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी
येथील यंत्रमाग उत्पादित कापडाचे घसरलेले भाव आणि कापड बाजारात निर्माण झालेली आर्थिक टंचाई यामुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट पडल्याने यंत्रमागधारक व कापड व्यापारी वर्ग हवालदिल झाले आहेत.