विनाअनुदानित शाळा समितीचा दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 03:40 PM2020-02-11T15:40:08+5:302020-02-11T18:06:37+5:30
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मक्लेश आंदोलनाअंतर्गत समितीच्यावतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार आहे.
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मक्लेश आंदोलनाअंतर्गत समितीच्यावतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार आहे.
दिंडीची सुरूवात सोमवारी होईल. त्याबाबतचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे लेखाधिकारी सुनिल रेणके यांना दिले.
शिष्टमंडळात कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, गजानन काटकर, जर्नादन दिंडे, शिवाजी खापणे, आनंदा वारंग, शिवाजी घाडगे, मच्छिंद्र जाधव, सावंत माळी, भानुदास गाडे, केदारी मगदूम, आदींचा समावेश होता.