गडहिंग्लज परिसरात अवकाळीचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:20 AM2021-01-09T04:20:19+5:302021-01-09T04:20:19+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व परिसराला अवकाळी पावसाने सुमारे २ तास झोडपून काढले. पावसाळ्यातील धुवाँधार पावसाप्रमाणे जानेवारी महिन्यात पाऊस ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व परिसराला अवकाळी पावसाने सुमारे २ तास झोडपून काढले. पावसाळ्यातील धुवाँधार पावसाप्रमाणे जानेवारी महिन्यात पाऊस झाल्याने शहरातील नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचीही तारांबळ उडाली.
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीही रात्री तर आज दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने ऊस तोडणीला थोडा ‘ब्रेक’ लागला असतानाच आजच्या मुसळधार पावसाने आणखी आठ दिवस तोडण्या खोळंबणार आहेत.
ज्वारी, वाटाणा, हरभरा, मसूर, मका, कांदा, लसूण आदी पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. मात्र, आणखी पाऊस झाल्यास हरभरा पीकही धोक्यात येणार आहे तर ऊस तोडणी लांबल्याने उत्पादनात घट होणार आहे. अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिक व ऊसतोडणी मजुरांची तारांबळ उडाली.
-----------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज शहर व तालुक्याला पावसाने दोन तास झोडपून काढले.
क्रमांक : ०८०१२०२१-गड-०२