‘ताराराणी’च्या आसमाची असामान्य कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:13 AM2021-02-05T07:13:34+5:302021-02-05T07:13:34+5:30

कोल्हापूर : कमला काॅलेजची धावपटू आसमा अजमल कुरणे हिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ताराराणी विद्यापीठ ते जयसिंगपूर असे ७२ ...

Unusual performance of 'Tararani' | ‘ताराराणी’च्या आसमाची असामान्य कामगिरी

‘ताराराणी’च्या आसमाची असामान्य कामगिरी

Next

कोल्हापूर : कमला काॅलेजची धावपटू आसमा अजमल कुरणे हिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ताराराणी विद्यापीठ ते जयसिंगपूर असे ७२ कि.मी.चे अंतर ९ तास २८ मिनिटात पूर्ण करीत नवा विक्रम प्रस्थापित केला.

सकाळी सहा वाजता या उपक्रमाची सुरुवात प्राचार्य डाॅ. क्रांतिकुमार पाटील यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. रेल्वे उड्डाण पूल, ताराराणी चौक, तावडे हाॅटेल चौक, कोल्हापूर सांगली फाटा, हेर्ले, चोकाक, अतिग्रे, हातकणंगले आणि सांगली फाटा (जयसिंगपूर) पुन्हा कोल्हापूरकडे असे ७२ कि.मी.चे अंतर आसमाने न थांबता पार केले. तिने जीपीएस प्रणालीचा वापर करीत वेळेचीही नोंद ठेवली. तिच्या उपक्रमाची दखल नॅशनल बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये लवकरच होईल. या उपक्रमात दोन वेळा पायाच्या नसा दुखावणे, आदी समस्यांना सामोरे जावे लागले. तरीही तिने हा उपक्रम न थांबता पार केला. तिने हा उपक्रम क्रीडाशिक्षक शामराव मासाळ, प्रा. ज्योती गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केला. तिला प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, सचिव प्राजक्त पाटील, डाॅ. आझाद नायकवडी आदींचे प्रोत्साहन लाभले.

फोटो : २७०१२०२१-कोल-आसमा

ओळी : कोल्हापूर ते सांगली फाटा (जयसिंगपूर) पुन्हा कोल्हापूर असे ७२ कि.मी. अंतर ९ तास २८ मिनिटात न थांबता, तेही तिरंगा घेऊन धावण्याचा नवा विक्रम आसमा कुरणे हिने बुधवारी प्रस्थापित केला. या उपक्रमानंतर तिच्यावर नातेवाईक, शिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

Web Title: Unusual performance of 'Tararani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.