‘इव्हेंट एक्सलन्स अवॉर्ड’ कॉफीटेबल बुकचे शानदार समारंभात अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:36+5:302021-09-02T04:49:36+5:30
कोल्हापूर : वाढदिवसापासून विवाहापर्यंत असे आयुष्यातील विविध क्षणांना अविस्मरणीय बनविण्याचे काम करणाऱ्या कोल्हापुरातील विविध ...
कोल्हापूर : वाढदिवसापासून विवाहापर्यंत असे आयुष्यातील विविध क्षणांना अविस्मरणीय बनविण्याचे काम करणाऱ्या कोल्हापुरातील विविध आठ इव्हेंट संस्थांचे मालक, संचालकांना ‘लोकमत’तर्फे इव्हेंट एक्सलन्स अवॉर्डने रविवारी शानदार समारंभात सन्मानित करण्यात आले. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते या अवॉर्डचे वितरण झाले. या इव्हेंट संस्थांचे मालक, संचालकांचा जीवनपट, विविध अडचणींवर मात करत केलेल्या व्यवसाय उभारणीचा प्रवास मांडणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सचिन-सागर डेकोरेशनचे संस्थापक आणि ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सागर चव्हाण, कसबेकर इव्हेंटचे संचालक किरण जाधव आणि मोहन जाधव, भावमंजुळ साउंड ॲण्ड लाइट्सचे संचालक संदीप चव्हाण आणि उदय चव्हाण, डीएम ग्रुप इव्हेंट ॲण्ड एक्झिबिशनचे संस्थापक दीपक मगर, अवधूतस इव्हेंट स्टुडिओचे संस्थापक अवधूत भोसले, गणेश साउंड सर्व्हिसेसचे संचालक विजय यादव, सिद्धी एलईडी वॉल ॲण्ड इव्हेंट्सचे मालक सुजय चव्हाण, उद्योगसेवा इंजिनिअरिंग ॲण्ड वेल्डिंग वर्क्सचे मालक सचिन साळुंखे यांना ‘लोकमत इव्हेंट एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक (निर्मिती) बाजीराव ढवळे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) श्रीराम जोशी, उपव्यवस्थापक (रिसिव्हेबल) महेश पन्हाळकर, सातारा आवृत्तीचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, सांगली आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘लोकमत कनेक्ट’चे उपव्यवस्थापक दीपक मनाठकर आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे संयोजन केले.
चौकट
राज्यातील ६६ जणांचा जीवनप्रवास उलगडला
या कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून राज्यातील ६६ जणांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. त्यात मंडप डेकोरेशन , साउंड, एलईडी स्क्रीन, अँकर, इव्हेंट मॅनेजमेंट संस्थांच्या मालक, संचालकांचा समावेश आहे.
फोटो (३१०८२०२१-कोल-इव्हेंट एक्सलन्स अवॉर्ड) : कोल्हापुरात रविवारी शानदार कार्यक्रमात विविध आठ इव्हेंट संस्थांचे मालक, संचालकांना ‘लोकमत इव्हेंट एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. त्यात डावीकडून किरण जाधव, मोहन जाधव, संदीप चव्हाण, उदय चव्हाण, सागर चव्हाण, दीपक मगर, अवधूत भोसले, विजय यादव, सुजय चव्हाण, सचिन साळुंखे यांचा समावेश होता. (छाया : नसीर अत्तार)