देवस्थानचा लोगो असलेल्या पोस्ट तिकिटाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:23+5:302021-02-05T07:15:23+5:30

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा लोगा असलेल्या पोस्टाचे तिकीट व कापडी पिशवीचे अनावरण बुधवारी समितीचे अध्यक्ष महेश ...

Unveiling of postage stamp with temple logo | देवस्थानचा लोगो असलेल्या पोस्ट तिकिटाचे अनावरण

देवस्थानचा लोगो असलेल्या पोस्ट तिकिटाचे अनावरण

Next

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा लोगा असलेल्या पोस्टाचे तिकीट व कापडी पिशवीचे अनावरण बुधवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाले. माय स्टँप या संकल्पनेंतर्गत अंबाबाईची माहिती जगभर पोहोचणार आहे, तर दहा हजार कापडी पिशव्यांवर समितीचा लोगो व पोस्टाची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे प्रिंट करण्यात आले असून, या पिशवीतून भाविकांना प्रसाद वितरित केला जाणार आहे.

अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात झालेल्या या कार्यक्रमात डाकघर विभागाचे सहायक अधीक्षक संजय वाळवेकर, निलोफर शेख, राजेंद्र पाटील, अमोल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रंकाळा तलावात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवल्याबद्दल देवस्थान समितीचे सिक्युरिटी गार्ड उमेश साळोखे आणि सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर मनोगतात महेश जाधव यांनी पोस्टाच्या माध्यमातून आई अंबाबाई भाविकांच्या घराघरांत पोहोचेल तसेच तिकिटाच्या माध्यमातून देश- विदेशात जाईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास पोस्टाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव शीतल इंगवले, सुयश पाटील, मिलिंद घेवारी, व्यवस्थापक धनाजी जाधव, राहुल जगताप आणि कर्मचारी उपस्थित होते.

--

फोटो नं ०३०२२०२१-कोल-देवस्थान पोस्ट तिकीट

फोटो नं ०३०२२०२१-कोल-देवस्थान लोगो

ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बुधवारी देवस्थान समितीचा लोगो असलेल्या पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय पोवार, राजेंद्र जाधव, शिवाजीराव जाधव यांच्यासह पोस्टाचे अधिकारी उपस्थित होते.

----

Web Title: Unveiling of postage stamp with temple logo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.