सोशल मीडियावर विकासकामांची विनाकारण बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:49+5:302021-06-22T04:17:49+5:30
पेठवडगाव : पालिकेच्या वतीने दर्जेदार विकासकामे करण्यात येत आहेत. एखाद्या कामाचा अपवाद वगळता सरसकट सोशल मीडियावर विनाकारण बदनामी करण्यात ...
पेठवडगाव : पालिकेच्या वतीने दर्जेदार विकासकामे करण्यात येत आहेत. एखाद्या कामाचा अपवाद वगळता सरसकट सोशल मीडियावर विनाकारण बदनामी करण्यात येत आहे. यावर सभागृहात चर्चा झाली. तर शहरातील निकृष्ट रस्ते, हॉस्पिटल बांधकाम यावरून प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न नगरसेवक संदीप पाटील यांनी केला.
सोमवारी महालक्ष्मी मंगलधाम येथे पालिकेची सर्वसाधारण सभा झाली.
विषय पत्रिकेवरील १४ तर आयत्या वेळेस आलेल्या सात विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. यावेळी माळी यांनी मराठा आरक्षण प्रश्नी व ओबीसींना राजकीय आंदोलनास पाठिंबा देण्याचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला.
संदीप पाटील यांनी भूमिनंदन कॉलनीकडे जाणारा नवीन रस्ता उखडला आहे. बांधकाम अभियंत्याचे नातेवाईक काम करत आहेत. याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरातील दीड कोटीचे रस्ते कुठे झालेत यांची माहिती द्या. ऑनलाईन टेंडर असताना आधीच कशी कामे झाली आहेत.
अजय थोरात म्हणाले, विनाकारण दिशाभूल करण्याचा प्रकार भविष्यासाठी घातक आहे. आम्ही निकृष्ट कामाला कधीही पाठिंबा देत नाही. प्रशासनाने चांगले काम करावे यासाठी पाठीमागे आहोत. तक्रार चुकीच्या कामावर करण्याऐवजी उभा राहून काम करावे. चुका असेल तर दुरुस्त करून घ्या असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष माळी यांनी निकृष्ट काम एक टक्का झाले तर त्याचे भांडवल केले जात आहे. परंतु ठेकेदाराला काम दिल्यानंतर दर्जेदार कामे करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील विकासकामे ही चांगली झाली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काहीजण भांडवल करीत आहेत.
सभेमध्ये चतुर्थ कर आकारणी स्थगिती देण्यात आली. तर महालक्ष्मी तलावातील पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्यास परवानगी देण्यात आली. मुस्लिम खाटीक, वीरशैव लिंगायत तेली समाजास जागा मागण्यासाठी शिफारस देण्यात आली. घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी मृत जनावरे, सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट करिता अॅनिमल वेस्ट इन्सिनरेटर मशीन खरेदी करण्याचा,सारिका दिलीप चव्हाण, ज्योती शामराव मोरे यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
चर्चेत गटनेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, संतोष गाताडे, शरद पाटील,दशरथ पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.
- कालिदास धनवडे यांची नगर अभियंता विरोधात तक्रार
पालिकेचे नगर अभियंता हे दलित वस्तीतील रस्ते, गटार कामांचे काय झाले यांची विचारणा केली असता, सिमेंटचे दर वाढले अशी कारणे सांगतात, अशी तक्रार कालिदास धनवडे यांनी केली. तर युवक क्रांतीचे माजी उपनगराध्यक्ष भीमराव दबडे यांच्या निधनाचा ठराव याही सभेत राहिला. पुन्हा नंतर संतोष गाताडे यांनी ठराव मांडला.