आगामी विधानसभा लढवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:20 AM2017-08-14T00:20:29+5:302017-08-14T00:20:29+5:30

The upcoming assembly elections | आगामी विधानसभा लढवाच

आगामी विधानसभा लढवाच

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा सांगाव : येत्या विधानसभेची निवडणूक लढवावीच असे आव्हान देतानाच मैदानातून पळ काढू नये, नाही तर लोक भ्याला म्हणतील, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी नाव न घेता पुणे म्हाडाचे अध्यक्ष, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना लगावला. सुळकूड येथे दूधगंगा नदीवरील बांधण्यात येणाºया नूतन पुलाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, ‘स्वाभिमानी’चे भगवान काटे प्रमुख उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले की, त्यांचे एक वयस्क कार्यकर्ते माझ्याकडे आले व म्हणाले की, अजून ते लहान आहेत, त्यांना माफ करा. ते असे का करीत आहेत असे विचारले असता कागल तालुक्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हसन मुश्रीफ यांना अंगावर घ्यावे लागेल. संजय घाटगे यांचे नाव रेसमधून कमी होण्यासाठी सारखे चर्चेत राहावे लागेल असे त्यांना कोणीतरी सांगितले आहे, असे हे कार्यकर्ते म्हणाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सन २०१२ मध्ये तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक व मी या पुलासाठी पाठपुरावा करून ५ कोटी निधी मंजूर केला होता. पाया न लागल्याने दोन ते अडीच कोटी वाढीव निधीची गरज होती. त्यासाठी खासदार महाडिक व राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले. शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे उद्घाटनाचे अधिकार आमदार व खासदार यांनाच असतात. त्यामुळे आमच्या आडवे येण्याचा प्रयत्न करु नका.
यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, सत्तेत नसतानाही मुश्रीफांची भागाच्या विकासासाठी निधी आणण्याची धडपड असते. मंत्री असताना मोठी कामे केली. युवकांचे विकासाभिमुख राजकारणाकडे लक्ष असल्याने ती करावी लागतील. यावेळी भगवान काटे, जि.प. सदस्य युवराज पाटील, भय्या माने, कनिष्ठ अभियंता गणेश गायकवाड, राहुल हेरवाडे, शिवाजी लगारे, आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमास अविनाश मगदूम, सरपंच युवराज पाटील, उपसरपंच आत्माराम लगारे, संजय हेगडे, पं.स.चे उपसभापती रमेश तोडकर, अरुण पाटील, शेखर पाटील, शिवानंद माळी, कॉन्ट्रक्टर उमेश पंचारिया, जालंदर लगारे, संजय चितारी, कनिष्ठ अभियंता जी. बी. पाटील. यु. डी. कोकणे, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मीकांत पाटील, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण मुदाण्णा यांनी केले. सुरेश डोणे यांनी सुञसंचलन केले. संजय खोत यांनी आभार मानले.
गाडीमध्ये कुदळ, फावडे घेऊनच फिरा : मुश्रीफ
गाडीमध्ये कुदळ व फावडे ठेऊन फिरावे म्हणजे कोठेही उद्घाटन करायचे झाले की ‘हाण कुदळ’ असे मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना उद्देशून म्हणाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचंड प्रेम केले असे सांगत तालुक्याच्या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातून एकही पैसा दिला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The upcoming assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.