पीयूसी अद्ययावत करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, कोल्हापुरात उद्यापासून तपासणी मोहीम
By सचिन भोसले | Published: November 8, 2023 07:21 PM2023-11-08T19:21:09+5:302023-11-08T19:21:23+5:30
कोल्हापूर : आपल्या वाहनांची वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि कर भरणा, योग्यता प्रमाणपत्र नसेल तर अशा वाहनधारकांवर उद्या, ...
कोल्हापूर : आपल्या वाहनांची वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि कर भरणा, योग्यता प्रमाणपत्र नसेल तर अशा वाहनधारकांवर उद्या, गुरुवारपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कारवाईचा बडगा उगारणार आहे.
वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने विविध उपक्रम, कारवाई अशा माध्यमातून कार्यरत असते. त्याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आज, गुरुवारपासून शहरासह जिल्ह्यभरात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. यासाठी शहर वाहतुक नियंत्रण शाखेची मदत घेतली जाणार आहे. यात वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, कर भरणा पावती अद्ययावत हवी. ती नसल्यास अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
असा दंड आकारला जाणार
यात दुचाकी वाहन असेल तर दोन, तर चारचाकीसह अन्य वाहनांकरीता चार हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. अशा दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. तरी वाहनधारकांनी पीयूसी व कर भरणा अद्ययावत करावी. असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर यांनी केली आहे.