मुख्यालयात अद्ययावत ‘सायबर लॅब’
By admin | Published: August 17, 2016 12:03 AM2016-08-17T00:03:41+5:302016-08-17T00:05:49+5:30
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : ६६ लाख रुपये खर्चून यंत्रणा
कोल्हापूर : आजच्या स्वातंत्र्यदिनी राज्यात ४४ ठिकाणी सायबर लॅब सुरू होत असून, अनेक सायबर गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांना जरब बसेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी (दि. १५) व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ६६ लाख रुपये खर्च करून पोलिस मुख्यालयात कार्यान्वित केलेल्या अद्ययावत सायबर लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरावर अद्ययावत सायबर लॅब कार्यान्वित झाल्याने अनेक सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस आणणे शक्य होणार असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, वाढत्या सायबर गुन्हेगारीला लगाम घालण्याचे काम सायबर लॅबद्वारे होईल. सायबर लॅबच्या माध्यमातून हार्ड डिस्क फॉरेन्सिक त्याचप्रमाणे मोबाईल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. जिल्हा स्तरावर सायबर लॅब ही काळाची गरज असून यापुढील काळात हा उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारकपणे राबवावा. पोलिस दलाची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच त्यांना अत्याधुनिक सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासही राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत तीन कोटी रुपये खर्चून सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. सायबर लॅब प्रकल्पाबरोबरच सायबर गुन्ह्यांविषयी लोकांना विशेषत: शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.’ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी आभार मानले. समारंभास वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)