युरिया अडीचशेचा; लिंकिंग साडेसातशेचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:00 AM2019-01-14T00:00:40+5:302019-01-14T00:00:48+5:30
कोपार्डे : रब्बी हंगामासह ऊस लावणीची भरणी, खोडवा यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून युरियाची मोठी मागणी आहे. मात्र, अनेक ठिकाणी युरियाची ...
कोपार्डे : रब्बी हंगामासह ऊस लावणीची भरणी, खोडवा यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून युरियाची मोठी मागणी आहे. मात्र, अनेक ठिकाणी युरियाची टंचाई दाखवत दोनशे पासस्ट युरियाच्या पोत्यांवर तब्बल साडेसातशे ते आठशे रुपयांच्या इतर सेंद्रिय खतांच्या पिशव्या गळ््यात मारून शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे.
युरिया वगळता सर्वच रासायनिक खते नियंत्रणमुक्तकेल्याने बहुतेक रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत. यात होणारी वाढ शेतकºयांच्या आवाक्याबाहेर जात असताना शासनाला मात्र या खतांच्या किमती नियंत्रणात ठेवता येत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून शेतकरी युरिया खताला सर्वाधिक पसंती देत आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांकडून रब्बी हंगामात पिकाला खत देण्यासाठी युरिया खताची मागणी वाढली आहे. शेतकºयांकडून युरिया खतांच्या होणाºया मागणीचा व युरियाच्या तुटवड्याचा फायदा उठवत खत कंपन्यांनी युरियाचे पोते पाहिजे असेल तर यावर रासायनिक खतांची २० व २५ किलोंची पिशवी देण्यास सुरुवात केली आहे. या पिशवीची किंमत साडेसातशे ते आठशे रुपये असून, तीनशे रुपयांच्या युरियाच्या पिशवीला आठशे रुपयांची सेंद्रिय खताची पिशवी घ्यावीच लागत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गहू, सूर्यफूल, भुईमूग या रब्बी पिकाबरोबर ऊसपिकाखाली सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र आहे. सिंचनाची चांगली सोय असल्याने भाजीपाला व अन्य आर्थिक पिकाकडे शेतकरी वळला आहे; पण रासायनिक खतांचे वाढलेले दर व स्वस्त असणारा युरिया पिकाला वापरावा म्हटले तरी लिंकिंगद्वारे होणारी आर्थिक लूट पाहता शेतकºयांचे अर्थकारण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.
इफ्को व कृभको या दोन कंपन्यांच परदेशातून युरिया खरेदी करतात. गेल्या चार वर्षांत या कंपन्यांकडून युरिया दर नियंत्रणात असल्याने निम्म्यावर आयात आणली आहे. यामुळे ऐन हंगामात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकºयांवर लिंकिंग लादायला सुरुवात केली आहे.
गेल्या चार वर्षांत देशात आयात युरिया व त्याचा खर्च
वर्षे आयात मे. टन खर्च दशलक्ष रु.
२०१५/१६ ८४.७३ २,०८७
२०१६/१७ ५४.८१ १,०४७
२०१७/१८ ५९.७५ १,२९५
२०१८/१९ ४२.०३ १,०४८