शेतकऱ्यांना बांधावर पोहोच होणार युरिया, सतीश पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 02:28 PM2020-10-24T14:28:24+5:302020-10-24T14:30:23+5:30
farmar, zila parishad, kolhapurnews कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आता शेतकऱ्यांच्या बांधावर युरिया खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. यासाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवावी लागणार आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आता शेतकऱ्यांच्या बांधावर युरिया खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. यासाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला चालू हंगामासाठी कोल्हापूर जिल्ह्याला एक हजार टन युरिया खताचा साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी १०८ टन युरिया उपलब्ध झाला आहे. ज्या गावातील शेतकऱ्यांना युरियाची गरज आहे, अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १० टनांपर्यंतच्या खतांची मागणी केल्यास त्यांना तो बांधावर पोहोच करण्यात येणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी फोन नंबर, मागणीपत्र तयार करून प्रतिबॅग २६६.५० रुपयांप्रमाणे रक्कम महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ यांच्याकडे भरणा करावयाची आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समिती सदस्य हेमंत कोलेकर, शंकर पाटील, कल्पना चौगुले, मनोज फराकटे, अश्विनी धोत्रे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.